Tuesday, April 8, 2025
Home बॉलीवूड बापलेकाची जोडी सुसाट! मुलगा आझादसोबत थिरकला आमिर खान, व्हिडिओ जोरदार व्हायरल

बापलेकाची जोडी सुसाट! मुलगा आझादसोबत थिरकला आमिर खान, व्हिडिओ जोरदार व्हायरल

हिंदी सिनेसृष्टीत ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट‘ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आमिर खान होय. आमिरने त्याच्या कारकीर्दीत यशाचे शिखर गाठले आहे. त्याने आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्यामुळे त्याची गणना सुपरस्टार्समध्ये होते. तो व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. त्याने त्याच्या रीना दत्ता आणि किरण राव या दोन्ही पत्नींना घटस्फोट दिला आहे. मात्र, तो त्याच्या मुलांच्या अगदी जवळ आहे. त्याची आयरा खान, जुनैद आणि आझाद यांच्याशी जबरदस्त बाँडिंग आहे. तो सध्या सर्व वेळ त्याच्या मुलांना देत आहे. नुकताच आमिर खानची लेक आयरा खान हिचा साखरपुडा पार पडला. यादरम्यानचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. त्यातील एकामध्ये आमिर खानचा मुलगा आझाद याच्यासोबतचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आमिरचा आझादसोबतचा व्हिडिओ
आमिर खानचा मुलगा आझाद (Aamir Khan Son Azad) हा व्हायरल व्हिडिओत वडिलांसोबत नाचताना दिसत आहे. या व्हिडिओत आमिर मुलगा आझादसोबत त्याच्याच ‘पापा कहते हैं’ गाण्यावर थिरकताना दिसत आहे. हे गाणे ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमातील आहे. हा सिनेमा आमिरच्या कारकीर्दीला कलाटणी देणारा म्हणून ओळखला जातो. अशात याच सिनेमातील सुपरहिट गाण्यावर आमिर आझादसोबत डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे.

आमिर आणि आझादचा हा व्हिडिओ ‘डार्लिंग्स’ फेम अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) याने शेअर केला आहे. त्याने यासोबतच काही फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये बॉलिवूड कलाकारांचा गोतावळा दिसत आहे. या फोटोत अभिनेत्री फातिमा सना शेख हीदेखील दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Varma (@itsvijayvarma)

आयरा खान (Ira Khan) हिच्या ड्रेसबद्दल बोलायचं झालं, तर तिने साखरपुड्यामध्ये लाल रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. दुसरीकडे, तिचा होणार पती नुपूर शिखरे (Nupur Shikhare) याने काळ्या रंगाचा टक्सीडो परिधान केला होता. दुसरीकडे, या साखरपुड्यात आमिर खाननेही वाहवा लुटली. मुलीच्या वाढदिवशी आमिरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तसेच, आझाद निळ्या रंगाच्या फॉर्मल कपड्यांमध्ये दिसला.

आमिर खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो शेवटचा ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याच्यासोबत करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हीदेखील मुख्य भूमिकेत होती. (actor aamir khan dances with son azad rao khan on daughter ira khan engagement party see video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
जरा इकडे पाहा! साऊथ सुपरस्टारला 9 तास बसावे लागले ईडी ऑफिसात, चौकशीनंतर म्हणाला, ‘मी सर्वकाही…’
काय सांगता! कियारा आणि सिद्धार्थ लवकरच अडकणार लग्नबंधनात? अभिनेत्री 2 डिसेंबरला करणार मोठी घोषणा

हे देखील वाचा