Thursday, April 18, 2024

जरा इकडे पाहा! साऊथ सुपरस्टारला 9 तास बसावे लागले ईडी ऑफिसात, चौकशीनंतर म्हणाला, ‘मी सर्वकाही…’

साऊथ इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने प्रचंड मोठा चाहतावर्ग कमावणाऱ्या अभिनेत्यांमध्ये विजय देवरकोंडा याचा समावेश होतो. विजयने खूप कमी वेळेत यशाचे शिखर गाठले आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आणि तरुणी अक्षरश: रांगा लावतात. मात्र, आता विजयबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. विजय बुधवारी (दि. 30 नोव्हेंबर) अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाला होता. ही चौकशी त्याच्या यावर्षी ऑगस्टमध्ये रिलीज झालेल्या ‘लायगर‘ या सिनेमासाठी जमवलेल्या रुपयांच्या स्त्रोताशी संंबंधित FEMA (परकीय चलन व्यवस्थापन अभिनेता) तपासासंदर्भात झाली. हैदराबादमध्ये तब्बल 9 तास विजय देवरकोंडाची ईडीकडून चौकशी झाली.

चौकशीनंतर काय म्हणाला विजय?
ईडीकडून विजय देवरकोंडाची चौकशी (Vijay Devarakonda Questioning By ED) झाल्यानंतर अभिनेत्याने दावा केला की, त्याने सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत. विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) याने चौकशीला आपल्या चाहत्यांच्या प्रेमाचा परिणाम म्हटले. तो म्हणाला की, “जेव्हा तुम्हाला सर्वजण प्रेम आणि स्नेह देतात, त्यामुळे काही समस्यान आणि दुष्परिणाम होणारच. मात्र, हा एक अनुभव आहे आणि हेच आयुष्य आहे. जेव्हा मला बोलावण्यात आले, तेव्हा मी माझे काम केले. मी प्रश्नांची उत्तर दिली.” यावेळी त्याला पुन्हा बोलावले जाईल का? असे विचारले असता, त्याने ‘नाही’ असे म्हटले.

सिनेमाच्या दिग्दर्शकाचीही होणार चौकशी?
खरं तर, मागील काही महिन्यांपासून ‘लायगर’ (Liger) सिनेमाच्या गुंतवणूकदारांमध्ये फंडाबाबत अनेक शंका आहेत. ईडीने सिनेमाचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ (Puri Jagannath) आणि त्यांच्या बिझनेस पार्टनर चार्मी कौर यांच्याशी जवळपास 12 तास चौकशीही केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

‘लायगर’ बॉक्स ऑफिसवर सपशेल फ्लॉप
‘लायगर’ सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर हा एक स्पोर्ट्स ऍक्शन ड्रामा सिनेमा होता. या सिनेमाचे बजेट जवळपास 125 कोटी इतके होते. या सिनेमात माजी बॉक्सर माईक टायसन याचाही समावेश होता. मात्र, सिनेमा रिलीज झाल्यानंतर जोरात आपटला. या सिनेमाला बजेटपेक्षा निम्मी कमाईदेखील करता आली नव्हती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
काय सांगता! कियारा आणि सिद्धार्थ लवकरच अडकणार लग्नबंधनात? अभिनेत्री 2 डिसेंबरला करणार मोठी घोषणा
नादच खुळा! पुण्याच्या ‘गोल्डन बॉईज’ची बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री, एमसी स्टॅनशी होतेय तुलना?

हे देखील वाचा