Sunday, May 19, 2024

एक्स बॉयफ्रेंडच्या कॉन्सर्टमधील केंडल जेनरचा ‘तो’ व्हिडिओ पाहाच, सर्वत्र होतोय व्हायरल

कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा जास्त वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचे धनी ठरतात. यामध्ये हॉलिवूड कलाकारही आघाडीवर असतात. त्यापैकीच एक म्हणजे अमेरिकन मॉडेल केंडल जेनर होय. केंडलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर येताच, ती पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली. काय आहे नेमके या व्हिडिओमध्ये चला जाणून घेऊयात…

काय आहे व्हिडिओत?
खरं तर, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत मॉडेल केंडल जेनर (Kendall Jenner) ही तिचा एक्स बॉयफ्रेंड हॅरी स्टायल्स (Harry Styles) याच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ असा प्रश्न उपस्थित होत आहे की, आता या दोघांमध्ये सर्वकाही व्यवस्थित झाले आहे का?

मॉडेल केंडल जेनर तिचा जवळचा मित्र हॅली रोड बीबरसोबत गायक हॅरी स्टायल्स याच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचली होती. यावेळी एका चाहत्याने तिचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ खूप कमी वेळेत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. व्हिडिओत हॅली आणि कायलीसोबतच केंडल हॅरीच्या प्रसिद्ध ‘डे ड्रीमिंग आणि वॉटरमेलन शुगर’ या गाण्यावर डान्स करताना दिसली.

माध्यमांतील वृत्तांनुसार, यादरम्यान किम कार्दशियनचा बालपणीचा आणि सर्वात चांगला मित्र ऍलिसन स्टॅटरही उपस्थित होता. कॉन्सर्टसाठी केंडलने स्नेकस्कीन प्रिंट हॉल्टर- नेक टॉप परिधान केला होता. हा ड्रेस तिने काळ्या रंगाची पँट आणि बॅगसोबत परिपूर्ण केला होता.

हेही वाचा- घटस्फोटांच्या चर्चांमध्ये मानसी नाईकची नवीन लक्षवेधी पोस्ट; म्हणाली, ‘नातेसंबंध तोडण्यापूर्वी एकदाही…’

खरं तर, फेब्रुवारी 2014मध्ये मॉडेल केंडल आणि सिंगर हॅरी यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. यादरम्यान अनेकदा त्यांना बाहेर फिरताना स्पॉट करण्यात आले होते. मात्र, दीर्घ काळापर्यंत हे नाते टिकू शकले नाही. एका वर्षानंतर दोघांचेही ब्रेकअप झाले होते. सध्या, केंडल जेनर बास्केटबॉल खेळाडू डेविड बुकरला डेट करत आहे. नुकतेच, या दोघांचा एक फोटोही व्हायरल झाला होता. मात्र, आता पुन्हा केंडल तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत दिसल्याने चाहते हैराण झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
व्हिडिओ: ‘पुष्पा’ची क्रेझ अजूनही कायम, भारतीयांचं सोडाच; थेट कोरियन मुलीनेही धरला ‘श्रीवल्ली’वर ठेका
जेव्हा मीनाक्षी शेषाद्रीने दिला होता सनी देओलसोबत किसींग सीन; म्हणाली, ‘तो खूपच…’

हे देखील वाचा