Saturday, June 21, 2025
Home बॉलीवूड आमिर खानची मुलगी इरा खानने बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करत व्यक्त केले दुःख, म्हणाली ‘गेल्या ४-५ वर्षांपासून मी…’

आमिर खानची मुलगी इरा खानने बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करत व्यक्त केले दुःख, म्हणाली ‘गेल्या ४-५ वर्षांपासून मी…’

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान ही बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असलेल्या स्टार किड्सपैकी एक आहे. इरा भलेही चित्रपटांमध्ये दिसली नाही, पण तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती अनेकदा चर्चेत असते. आमिरची मुलगी नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलत असते. मग ते तिचे नैराश्य असो किंवा आई-वडिलांचा घटस्फोट. इरा तिच्या इंस्टाग्राम सोशल मीडिया अकाऊंटवरून अनेकदा धक्कादायक खुलासे करते.

आता अलिकडेच इराने (Ira Khan) तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आणखी एक माहिती सर्वांसोबत शेअर केली आहे, जी थोडी धक्कादायक आहे. तिच्या लेटेस्ट पोस्टमध्ये इराने सांगितले की, गेल्या ४-५ वर्षांत तिचे वजन सुमारे २० किलोने वाढले आहे. यामुळे तिला बरे वाटत नव्हते. पण अलिकडे वजन कमी करण्यासाठी फास्टिंग सुरू केला.

तिच्या लेटेस्ट पोस्टमध्ये इराने तिची बॉयफ्रेंड नुपूर शिखरसोबतचे बरेच फोटो शेअर केले आहेत. तसेच काही सोलो फोटो शेअर केले आहेत ज्यात तिचे वजन वाढताना दिसत आहे. फोटो शेअर करताना इराने लिहिले की, “अलिकडे मी १५ दिवसाचे फास्टिंग केले आहे. जेणेकरून मी वजन कमी करू शकेन. सेल्फ मोटिव्हेशन आणि सेल्फ इमेज विभागात मला बरे वाटत नव्हते. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात खूप सक्रिय आहे, परंतु गेल्या ४-५ वर्षांपासून मी खूप कमी सक्रिय होते. त्यामुळे माझे वजन २० किलोने वाढले आणि ते मला खरोखर त्रास देत होते.”

इराने पुढे सांगितले की, इराने सांगितले की, तिने किती वजन कमी केले आहे, याचा अंदाज नाही, पण आता ती अधिक मेहनत घेत आहे आणि स्वतःला प्रेरित करत आहे.

इरा खान आहे रीना दत्ताची मुलगी 

इरा खान ही आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ताची मुलगी आहे. इरा खानचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

हेही वाचा :

अर्जुन कपूरने शेअर केलेल्या ‘या’ गोष्टीला अनुष्का शर्माने दिली पूर्ण सहमती

लग्नानंतर एकाच महिन्यात भांडी घासताना दिसली कॅटरिना कैफ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

काय सांगता! अभिनेता सोनू सूदने काँग्रेस पक्षात केला प्रवेश? वाचा संपूर्ण प्रकरण

 

हे देखील वाचा