काय सांगता! अभिनेता सोनू सूदने काँग्रेस पक्षात केला प्रवेश? वाचा संपूर्ण प्रकरण

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (sonu sood) हा चांगलाच चर्चेत असतो. एक अभिनेता म्हणून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहेच. परंतु एक माणूस म्हणून देखील त्याने त्याच्यातील माणुसकी दाखवली आहे. कोरोना काळात त्याने अनेकांना मदत केली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी तो ‘देवमाणूस’ झाला आहे. त्याच्या व्यावसायिक तसेच वैक्तिक आयुष्याबाबत तो नेहमीच माहिती देत असतो. अशातच त्याच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे की, तो राजकारणात प्रवेश करणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सोनू सूदची बहीण मालविका सूद हिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तसेच ती पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मैदानात उतरणार आहे. याबाबत काँग्रेस पंजाबकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. मात्र, संजय निरुपण यांनी ट्विट करताना सोनू सूद याचे काँग्रेस पक्षात स्वागत असे लिहिल्याने अनेकांना त्यांनेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला की काय? असा प्रश्न पडलाय. (actor sonu sood enter in politics? read full story)

त्यांनी फोटो शेअर करून लिहिले आहे की, “समाजसेवक, अभिनेता आणि माझा मित्र सोनू सूद याचे काँग्रेस परिवारात स्वागत आहे.” त्यांनी शेअर केलेल्या या फोटो आणि कॅप्शनमुळे सोनूच्या चाहत्यांना आता असे वाटत आहे की, सोनू सूद राजकारणात उतरला आहे. परंतु खरी माहिती अशी आहे की, त्याच्या बहिणीने राजकारणात प्रवेश केला आहे. परंतु याबाबत सोनू सूदने अजूनही कोणतीही माहिती अधिकृत केली नाही.

सोनू सूदच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याच्याकडे अनेक मोठे चित्रपट आहेत. तो अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यातील सोनू सूदच्या लूकला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा :

 

Latest Post