Thursday, March 5, 2026
Home बॉलीवूड किरण रावशी घटस्फोटानंतर, रात्री उशिरा पहिली पत्नी रीना दत्ताच्या घरी पोहोचला आमिर खान; फोटो व्हायरल

किरण रावशी घटस्फोटानंतर, रात्री उशिरा पहिली पत्नी रीना दत्ताच्या घरी पोहोचला आमिर खान; फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखला जातो. तसेच त्याचा कोणताही चित्रपट आला की, तो सुपरहिट ठरतोच. आमिर खान पुन्हा एकदा सिंगल झाला असून, या सिंगलपणाची झलक त्याच्या ड्रेसिंग सेन्समध्ये पाहायला मिळत आहे. आमिर खानला नुकताच स्पॉट करण्यात आला आणि यावेळी त्याचा लूक पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. अलीकडे घटस्फोटामुळे चर्चेत असलेला आमिर खान रात्री उशिरा पहिली पत्नी रीना दत्ताच्या घरी पोहोचला. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

घटस्फोटानंतर देखील आमिर त्याची एक्स पत्नी रीना दत्ता आणि किरण राव या दोघींसोबत चांगली मैत्री आहे. आमिर अनेकदा रीना दत्ता आणि किरण रावसोबत लंच-डिनर करतो. यासोबतच सर्वांच्या भेटीगाठीही सुरू असतात. दरम्यान, रविवारी (१४ नोव्हेंबर) रात्री उशिरा आमिर जेव्हा रीना दत्ताच्या घरी पोहोचला तेव्हा पॅपराजींनी त्याला पाहिले. यावेळी आमिर कॅज्युअल लूकमध्ये दिसला. यादरम्यान आमिरने कोरोनापासून वाचण्यासाठी फेस मास्क लावला होता.

आमिरने त्याची पहिली पत्नी रीना दत्ताला घटस्फोट दिला आणि किरण रावशी लग्न केले. मात्र, १५ वर्षांनंतर आमिर आणि किरण राव यांचाही घटस्फोट झाला. आमिर खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करत आहे.

आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. करीना कपूर खान देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. हा हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स मुख्य भूमिकेत दिसला होता. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होणार होता, मात्र लॉकडाऊनमुळे शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही. आता हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सलमान अन् राणीने ‘तेरी चुनरिया’वर केला जबरदस्त डान्स, चाहत्यांच्या आठवणी झाल्या ताज्या

-कंगना रणौतला पुरस्कार, पण तुमच्या नावाचा विचार का नाही झाला? पाहा या प्रश्नावर काय म्हणाला सोनू सूद

-मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी

हे देखील वाचा