Monday, July 1, 2024

मानलं पाहिजे! ‘अंतिम’ चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनसाठी आयुष शर्मा धावला तब्बल ‘इतके’ किलोमीटर

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेता आयुष शर्मा अभिनित ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन्ही मेहुणे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. चित्रपटातील आयुष आणि सलमानचा लूक खूपच अनोखा आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित झाल्यापासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘अंतिम’ हा मराठी चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा रिमेक आहे. या चित्रपटात आयुष आणि सलमानचे काही सर्वोत्तम ऍक्शन सीन असतील. या चित्रपटाच्या क्लायमॅक्सचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘अंतिम’चा शेवटचा भाग पुण्यात शूट करण्यात आला आहे. चित्रपटाच्या शेवटच्या सीनच्या गरजेनुसार, आयुषला पुण्यातील रस्त्यांवर तब्बल ३३ किलोमीटरहून अधिक अंतर पार करावे लागले आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्ससाठी आयुषला पाच ते सहा तास धावपळ करावी लागली. त्यात पुण्यातील काही गर्दीच्या ठिकाणांचाही समावेश होता. धावत्या वाहनांपासून आयुषला पळावे लागले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये आयुष रस्ता एका बाजूने वाहनाच्या विरुद्ध दिशेने धावताना दिसत आहे. त्यासह काही गुंड त्याच्या मागे पळताना दिसत आहेत.

‘अंतिम’ची कहाणी
या चित्रपटाच्या कथेत एक पोलीस आणि गुंड आमने-सामने दिसणार आहेत आणि दोघांमधील प्रचंड चकमकी आणि संघर्ष पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या नावामागील कथा काय आहे, हेही खूप रंजक आहे. आयुषने माध्यमांशी केलेल्या खास संवादात या चित्रपटाच्या नावामागील कथा सांगितली आहे. आयुष म्हणाला की, “’अंतिम’ हे या कथेसाठी सर्वात योग्य शीर्षक आहे. त्यात खूप खोल संदेश आहे. जेव्हा तुम्ही चित्रपट पाहाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक गोष्ट कधी ना कधी संपलीच पाहिजे.”

या चित्रपटात आयुष एका मराठी मुलाची भूमिका साकारत आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री महिमा मकवाना या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून सलमान पुन्हा एकदा पोलिसाच्या भूमिकेत आहे. ‘अंतिम’ २६ नोव्हेंबरला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘अंतिम’चे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. लॉकडाऊननंतर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणारा सलमानचा हा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी भाईजान ‘राधे’मध्ये दिसला होता. मात्र, तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अतरंगी कथा असणाऱ्या आणि प्रेमाचा त्रिकोण दाखवणाऱ्या ‘अतरंगी रे’ सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीझ

-हाय गर्मी! मोनालिसाने मिनी स्कर्ट घालून केला जबरदस्त डान्स, ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा

-बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, क्यूटनेस पाहून चाहतेही दंग

हे देखील वाचा