लॉक अप टू हा रियालिटी शो प्रचंड गाजला आणि नुकताच याचा महाअंतिम सोहळा पार पडला असून चाळीस दिवसाच्या या प्रचंड संघर्ष आणि विविध टास्क आणि ट्विस्टने हा शो प्रचंड गाजला. आणि या ‘लॉक अप २’ या रिॲलिटी शोला अखेर त्याचा नवा विजेता मिळाला आहे. 27 जून रोजी 15 स्पर्धकांसह सुरू झालेल्या या बहुप्रतिक्षित शोच्या महाअंतिम सोहळ्याने प्रेक्षकांची उत्सुकता संपवली, ज्यात श्रेया कालराने या सीझनची चमकदार ट्रॉफी जिंकली आहे. तसेच 1 कोटी रु असे बक्षीस जिंकले आहे.
फराह आणि रितेशने (ritesh)श्रेयाचे नाव जाहीर करताच शिल्पा शिंदे आनंदाने उड्या मारत होती आणि श्रेया कालराच्या विजयाने ती खूप आनंदित झाली होती. श्रेया कालरा विजयी ठरताच तीचे चाहते खुप आंनदी झाले. अंतिम सोहळ्यात श्रेया कालरा, शिवांगी जोशी, शिल्पा शिंदे, योगेश रावत आणि राम कपूर हे टॉप पाच स्पर्धक होते.
फराह खान आणि रितेश देशमुख यांनी सुत्रसंचालन केले होते तर त्यांनी या कार्यक्रमात विजेत्याचा निर्णय केवळ मागील कामगिरीवरच नव्हे तर अंतिम फिनाले टास्क, ज्युरी मीडीया आणि प्रेक्षकांच्या मतदानावरही आधारित होता. श्रेयाने फिनाले टास्कमध्ये केवळ तिची मानसिक आणि शारीरिक क्षमताच दाखवली नाही तर तिने प्रेक्षकांची मनेहि जिंकली होती तर योगेशने फिनालेच्या अगदी आधी एक टास्क जिंकुन 10 लाख रु बक्षीस जिंकली होती. पण बाकीच्या उपविज्यांताना रिकाम्या हातानेच परतावे लागले आहे.
हेही वाचा
जिया शंकरने दिली प्रेमाची कबुली; सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो










