Tuesday, September 26, 2023

काय सांगता! अभिनेता अभिषेक बच्चन करणार राजकारणात प्रवेश? वाचा संपूर्ण प्रकरण

बाॅलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनला चित्रपटसृष्टीत 23 वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. त्याने अभिनयाच्या जोरावर खूर प्रसिद्धी मिळवली आहे. त्याचे लाखो चाहते आहेत. त्याने सिनेसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहे. सिनेसृष्टीतील या प्रवासात अभिनेता स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. सध्या अभिषेक एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे.

‘धूम 3’मध्ये इंस्पेक्टर जयची भूमिका केल्यानंतर अभिषेक (abhishek bachchan) याने ‘हॅपी न्यू इयर’, ‘द शौकीन्स’, ‘ऑल इज वेल’ आणि ‘हाऊसफुल 3’ सारख्या चित्रपटांमध्ये तो झळकला आहे. मात्र, त्यानंतर त्यांनी ब्रेक घेतला आणि 2018मध्ये मनमर्जियांसोबत दमदार पुनरागमन केले. या चित्रपटात त्याच्याासाेबत विकी कौशल आणि तापसी पन्नू यांच्याही मुख्य भूमिका झळकल्या होत्या. आता अभिषेक राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, अभिषेक बच्चन लवकरच अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात सामील होणार आहेत. अभिषेक 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत अलाहाबादमधून निवडणूक लढवणार आहे. तो आपल्या वडिलांप्रमाणे अलाहाबादमधून निवडणूक लढवणार आहे. मात्र, अद्याप अभिषेक बच्चन आणि समाजवादी पक्षाकडून याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर ‘बिग बींनी’ यांनी काही काळ राजकारणात प्रवेश केला होता. 1984 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली पण जुलै 1987 मध्ये त्यांनी राजीनामा दिला. तर जया बच्चन पहिल्यांदा 2004-2006 मध्ये खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2018 मध्ये त्या राज्यसभा सदस्य झाल्या.

अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. 2013 मध्ये दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने राजकीय कारकिर्दीबद्दल सांगितले. तो म्हणाले की, “माझे आई-वडील राजकारणात आहेत पण मी स्वतः राजकारणात जाणार नाही. मी पडद्यावर नेत्याची भूमिका साकारू शकतो. पण खऱ्या आयुष्यात नाही. मी कधीही राजकारणात पाऊल ठेवणार नाही.” आता खरच अभिषेक राजकारणात प्रवेश करणार का? हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे. (Actor Abhishek Bachchan will enter politics)

अधिक वाचा- 
– परी म्हणू की सुंदरा ! बार्बी गर्ल झाली एव्हरग्रीन भूमी पेडणेकर
वर्षाकाठी 25 कोटी छापते कॅटरिना, ‘इतक्या’ कोटींची आहे मालकीणबाई; चार वर्षे ठरलीये आशियाची मादक अभिनेत्री

हे देखील वाचा