Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड ‘या’ कारणास्तव ‘हाऊसफुल्ल 3’नंतर अभिषेक बच्चनने घेतला ब्रेक; म्हणाला, ‘मी साइनिंग अमाउंट…’

‘या’ कारणास्तव ‘हाऊसफुल्ल 3’नंतर अभिषेक बच्चनने घेतला ब्रेक; म्हणाला, ‘मी साइनिंग अमाउंट…’

बाॅलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनला चित्रपटसृष्टीत 23 वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रवासात अभिनेता स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. अशात अलीकडेच अभिषेकने 2016मध्ये ‘हाऊसफुल 3‘ रिलीज झाल्यानंतर ब्रेक घेऊन साइनिंग अमाउंट परत करण्याचे कारण सांगितले. काय म्हणाला अभिनेता? चला, जाणून घेऊया…

‘धूम 3’मध्ये इंस्पेक्टर जयची भूमिका केल्यानंतर अभिषेक (abhishek bachchan) याने ‘हॅपी न्यू इयर’, ‘द शौकीन्स’, ‘ऑल इज वेल’ आणि ‘हाऊसफुल 3’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, त्यानंतर त्यांनी ब्रेक घेतला आणि 2018मध्ये मनमर्जियांसोबत पुनरागमन केले. या चित्रपटात त्याच्याासाेबत विकी कौशल आणि तापसी पन्नू यांच्याही मुख्य भूमिका होत्या.

अशात माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत अभिषेक म्हणाला, “मी खूप समाधानी होतो. मला चांगले काम मिळत होते, चांगले पैसेही मिळत होते, सगळे चित्रपट सुपरहिट होत होते, पण मी स्वतःला ढकलत नाही हे मला माहीत होतं.” तो पुढे म्हणाला, “तुम्ही कोणताही चित्रपट हलक्यात घेऊ शकत नाही. कारण, लोक त्यांच्या कष्टाचे पैसे तुमच्यावर गुंतवत असतात. झाेपेचा त्याग करत असतात. कुठेतरी हीच ती किंमत असते, जे  तुम्ही एक अभिनेता म्हणून गिफ्ट देऊ शकता. म्हणून, मी म्हणालो, मला थांबू द्या. त्यावेळी मी साइन केलेले सर्व चित्रपट सुरू झाले नव्हते, त्यामुळे मी त्याची साईनिंग अमाउंटही परत केली. मी त्यांना सांगितले की, मला गोष्टींबद्दल दोनदा विचार करण्याची गरज आहे. मी ऑफ घेतला, त्यानंतर मी परत आलो आणि अशा प्रकारचे काम निवडू लागलो, ज्यामुळे माझी रात्रीची झाेप उडेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो शेवटचा दसवीं (2022) चित्रपटात दिसला होता. याशिवाय ‘ब्रीद’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्येही तो दिसला होता. इतकेच नव्हे, तर अभिनेत्याने या वर्षी अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटात कॅमिओ केला होता.(bollywood actor abhishek bachchan took break post housefull 3 this is the reason )

अधिक वाचा:
डिलिव्हरीपूर्वी ‘अशी’ झाली हाेती रामचरणच्या पत्नीची अवस्था, माैत्रिणिने शेअर केला व्हिडिओ
व्हायरल फोटोंनंतर गेहना वशिष्ठने फैजानसोबत लग्न न झाल्याचा केला खुलासा; म्हणाली, ‘माझ्या बॉयफ्रेंडचे नाव..’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा