बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू हिचा चित्रपट ‘दृश्यम 2‘ बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. अजय-तब्बूचा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना खूप आवडला आहे. चित्रपटातील दोघांचा अभिनय आणि कथा खूपच रंजक आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाल्यावर अजयने काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. खुद्द अजयने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
अभिनेता अजय देवगण (ajay devgn) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, ‘काशी विश्वनाथच्या दर्शनाची, खूप दिवसांपासून वाट पाहत होतो! सर्वत्र शिव.’
View this post on Instagram
अजय देवगणच्या या पोस्टनंतर चाहते त्याच्या चित्रपटासाठी अभिनंदन करत आहेत. फोटोमध्ये तो कपाळावर चंदन लावताना दिसत आहे. ‘दृश्यम 2’ रिलीज झाल्यानंतर अजयने त्याच्या आगामी ‘भोला’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, काशी विश्वनाथचे दर्शन घेतल्यानंतर अजय त्याच्या खासगी विमानातून वाराणसीला पोहोचला. दर्शनानंतर तो चेतसिंग घाटावर गेला आणि गंगा आरतीमध्येही सहभागी झाला, त्यानंतर ताे शूटिंग लोकेशन रामनगर किल्ल्यावर पोहोचल्या आणि शूटिंगला सुरुवात केली.
भोला चित्रपटाशी विषयी बाेलायचे झाले, तर या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती अजय देवगण करत आहे. हा चित्रपट 30 मार्च 2023ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय पुन्हा एकदा तब्बूसोबत दिसणार आहे. त्याचा हा आगामी चित्रपट साऊथचा हिट चित्रपट ‘कैथी’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे, जो पाहून प्रेक्षकांना खूप आनंद झाला. ( actor ajay devgn visited baba vishwanath after hit drishyam 2 on box office )
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘माझ्या वाढदिवसाला आख्खा सातारा बंद ठेवा’, बिग बॉस फेम अभिजित बिचुकले नक्की का चिडलाय? वाचा
नागराज मंजुळे उतरणार ‘कुस्ती’च्या आखाड्यात, रुपेरी पडद्यावर झळकणार महाराष्ट्राचं वैभव