Friday, May 24, 2024

कार्तिक आर्यनने अजय देवगणसोबत खाल्ली ‘पावभाजी’, फाेटाेपेक्षा कॅप्शनने वेधले लक्ष

अभिनेता कार्तिक आर्यन आणि अजय देवगण हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कलाकार आहेत. नुकताच अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट चाहत्यांची आणि समीक्षकांची मनं जिंकताना दिसत आहे. ‘दृश्यम 2‘मध्ये अजय देवगणसोबत तब्बू, श्रिया शरण, अक्षय खन्ना हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अजय देवगणसाठी हा चित्रपट मोठा यश मानला जात आहे. दरम्यान, ‘भूल भुलैया 2‘ मधील रूह बाबा म्हणजेच कार्तिक आर्यनने ‘दृश्यम’च्या विजय साळगावकरसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये कार्तिक (kartik aaryan) पांढरा शर्ट आणि ग्रे स्वेटरमध्ये दिसत आहे. तर अजय देवगण (ajay devgn) या फोटोत पांढरा शर्ट आणि काळा कोट परिधान केलेला दिसत आहे. मात्र, या फाेटाेपेक्षाही कार्तिकच्या मजेशीर कॅप्शनने युजर्सचे लक्ष वेधले आहे.

हा फोटो शेअर करत कार्तिक आर्यनने कॅप्शनमध्ये लिहिले की, “विजय साळगावकर आणि रूह बाबा यांनी 2 ऑक्टोबरला गोव्यात एकत्र पावभाजी खाल्ली आणि 3 ऑक्टोबरला सत्संग करून मुंबईला परतले. PS – पावभाजी खूप चांगली होती. कार्तिकचे हे मजेशीर कॅप्शन वाचून त्याचे चाहते हसत आहेत.

कार्तिक आर्यनच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर कार्तिकचा ‘भूल भुलैया 2’ हा या वर्षातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. कार्तिकचा चित्रपट ‘फ्रेडी’ डिस्ने प्लस हॉट स्टारवर 2 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

दुसरीकडे,अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या महिन्यात अजयचा ‘थँक गॉड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही. मात्र, अजयचा ‘भोला’ हा चित्रपट पुढील वर्षी मार्चमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात त्याची ‘दृश्यम’ को-स्टार तब्बूही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (bollywood actor kartik aaryan shares a funny photo with ajay devgn gets interesting reaction from fans)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
‘टीनाला दाखवावं लागेल तिचं स्टेटस’, सुंबूल-शालीनच्या नात्यावर ‘इमली’च्या वडिलांचं मोठं वक्तव्य
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! एव्हलिन शर्माने वाढदिवसानिमित्त एका वर्षानंतर दाखवला लेकीचा चेहेरा

हे देखील वाचा