Thursday, July 31, 2025
Home बॉलीवूड Akshay Kumar Cricket Team: बॉलिवूडचा ‘खिलाडी कुमार’ झाला क्रिकेट संघाचा मालक, पोस्ट करत दिली माहिती

Akshay Kumar Cricket Team: बॉलिवूडचा ‘खिलाडी कुमार’ झाला क्रिकेट संघाचा मालक, पोस्ट करत दिली माहिती

बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेटर (Cricket) यांचे खूप जवळचे नाते निर्माण झाले आहे. अनेक सुपरस्टार्सना अभिनयासोबतच क्रिकेटमध्येही खूप रस आहे. अनेक सेलिब्रिटी क्रिकेट संघांचे मालकही आहेत. यामध्ये शाहरुख खानपासून (Shah Rukh Khan) जुही चावला आणि प्रिती झिंटापर्यंतच्या (Preity Zinta) नावांचा समावेश आहे. आता या यादीत बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचेही(Akshay Kumar ) नाव जोडले गेले आहे. होय, अक्षय कुमारही क्रिकेट संघाचा मालक बनला आहे.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार (Akshay Kumar Cricket Team)आता क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुढे आला आहे. त्याने इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या (ISPL) श्रीनगर संघाचा मालकी हक्क घेतला आहे. या संघात खेळण्यासाठी अक्षय कुमारने खेळाडूंना आवाहन केले आहे.

अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्राम (Akshay Kumar Instagram) पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सिनेमापासून स्टेडियमपर्यंत. मला सांगायला अभिमान वाटतो की मी श्रीनगर (जम्मू काश्मीर) येथील संघाचा मालक म्हणून इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये येत आहे. माझ्या संघात खेळण्याची अजून एक संधी शिल्लक आहे. तुम्हाला क्रिकेटमध्ये करिअर करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या कौशल्याचा आणि मेहनतीचा पुरावा देण्याची संधी आहे. मी तुमच्या पाठीशी आहे.”

ISPL ही एक स्ट्रीट क्रिकेट लीग (Cricket Team) आहे. जी देशभरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केली जाते. या लीगमध्ये 24 संघ सहभागी असतात. या संघांचे मालक सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, अक्षय कुमार यांसारखे सेलिब्रिटी आहेत. अक्षय कुमारच्या या निर्णयाचे क्रिकेट जगात स्वागत झाले आहे. अनेक क्रिकेटपटूंनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय कुमारच्या या निर्णयामुळे स्ट्रीट क्रिकेटला प्रोत्साहन मिळेल आणि अनेक खेळाडूंना नवीन संधी मिळतील अशी अपेक्षा आहे. (Akshay Kumar Becomes Proud Owner Of Team Srinagar In Indian Street Premier League)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 अक्षय कुमारच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता अक्षय कुमार सध्या अनेक हिट चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. त्याचा शेवटचा रिलीज झालेला ‘मिशन रानीगंज’ (Mission Raniganj) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. अभिनेत्याला आशा आहे की, 2024 त्याच्यासाठी भाग्यवान ठरेल. अक्षय कुमारचा पुढच्या वर्षीचा पहिला चित्रपट अली अब्बास जफरचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ असेल जो एप्रिलमध्ये ईदला रिलीज होणार आहे. (Actor Akshay Kumar has bought a Srinagar team in the New Indian Street Premier League.)

आधिक वाचा-
‘त्या’ भामट्याने थेट जेलमधून पुन्हा लिहिले जॅकलिनला प्रेमपत्र; म्हणाला, ‘मी तुला भेटण्यासाठी…’
Shweta Tiwari Christmas preparation 2023: श्वेता तिवारीने मुलगा रेयांशसोबत केला ख्रिसमसची तयारी, पाहा भन्नाट फाेटाे

 

 

हे देखील वाचा