Monday, October 14, 2024
Home बॉलीवूड ‘डर’साठी जुही चावला नव्हती पहिली पसंती, ‘या’ सुंदर अभिनेत्रीला काढून टाकण्यासाठी आमीरने केली होती युक्ती!

‘डर’साठी जुही चावला नव्हती पहिली पसंती, ‘या’ सुंदर अभिनेत्रीला काढून टाकण्यासाठी आमीरने केली होती युक्ती!

दिव्या भारतीने (Divya Bharti) वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तिच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ती इतक्या वेगाने यशाच्या पायऱ्या चढत गेली की, ती तिच्या काळातील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक बनली. पण तुम्हाला माहीत आहे का, की सनी देओल (Sunny Deol) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) स्टारर सुपरहिट चित्रपट ‘डर’मध्ये दिव्याच्या जागी आमिर खानने (Aamir Khan) जुही चावलाला (Juhi Chawla) स्थान दिले. मात्र, नंतर आमिरलाच काढून टाकण्यात आले आणि त्याच्या जागी शाहरुखला घेण्यात आले. 

आमिर आणि दिव्याची कधीच साथ जमली नाही. 1992 मध्ये आमिरने लंडन दौऱ्यात दिव्या भारतीसोबत परफॉर्म करण्यास नकार दिला. तेव्हा ती त्याच्यावर चिडली. या घटनेचा तिला खूप धक्का बसला आणि ती तासनतास रडली होती. नंतर सलमान खानने (Salman Khan) तिची हिंमत वाढवली आणि तिच्यासोबत परफॉर्म केले. (when aamir khan replaced divya bharti with juhi chawla in darr)

स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत दिव्याने त्या घटनेबद्दल सांगितले होते. ती आमिरबद्दल म्हणाली होती की, त्याला सिनियर असण्याचा अभिमान आहे, हे खूप दुःखदायक आहे आणि आमच्यासारख्या ज्युनियरकडून काही चूक झाली असेल तर त्याचा अर्थ तुम्ही आऊट आहात. त्यांनी चांगल्या वरिष्ठाप्रमाणे वागायला हवे आणि चुका झाल्यावर समजावून सांगावे.”

‘डर’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर या चित्रपटातील किरणच्या भूमिकेसाठी दिव्याची निवड झाली होती. पण नंतर जूही चावलाने तिची जागा घेतली. एका जुन्या फिल्मफेअर मुलाखतीत दिव्याची आई मीता भारती म्हणाली होती की, “अनेकांना अजूनही वाटते की, दिव्याने ‘डर’ गमावला कारण यश चोप्रासोबत समस्या होती. मुद्दा तो नव्हता. जेव्हा सनीला साइन केले गेले, तेव्हा त्याला त्याच्या विरुद्ध दिव्याला कास्ट करायचे होते. पण आमिरला तिच्या जागी जुहीला घ्यायचे होते. दुर्दैवाने, त्यावेळी आम्ही काही शोसाठी अमेरिकेत होतो.” तिथून येईपर्यंत त्यांनी आमिर, सनी आणि जुहीसोबत ‘डर’ची घोषणा केली, असेही ती यावेळी म्हणाली.(when aamir khan replaced divya bharti with juhi chawla in darr)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

‘हरियाणाची शकीरा’ गाैरी नागोरी बिग बाॅस शोमधून बाहेर, जाणून घ्या कसा होता प्रवास

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा