Wednesday, July 3, 2024

Video: कितीही व्यस्त स्केड्युल असले, तरीही आईसोबत वेळ घालवणे विसरत नव्हता ‘खिलाडी’ अक्षय कुमार

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आईने बुधवारी (८ सप्टेंबर) अखेरचा श्वास घेतला. आई गमावण्याचे दु: ख अक्षय कुमारसाठी असह्य आहे. अक्षयचे त्याच्या आईवर खूप प्रेम होते आणि त्या त्याच्या खूप जवळ होत्या. ‘खिलाडी’ अक्षय एक आदर्श मुलगा होता, जो त्याच्या आईची खूप काळजी घेत होता. तो प्रत्येक वेळ त्याच्या आईची काळजी घ्यायचा. तो कितीही व्यस्त असला, तरी खिलाडी कुमार आईसोबत वेळ घालवायला विसरत नव्हता. मात्र, अक्षय कुमारच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी त्याच्या आईचे निधन झाले.

अक्षय आईसोबत वेळ घालवायला विसरला नाही
अक्षय कुमारने २०१९ मध्ये त्याच्या आईचा लंडनच्या रस्त्यावर फिरतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओसह लिहिलेले कॅप्शन सांगते की, अभिनेत्याने आपल्या आईची किती काळजी घेतली. अक्षयने लिहिले होते की, “लंडनमध्ये आईसोबत काही वेळ घालवण्यासाठी शूट आयोजित केले होते. तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही व्यस्त असलात आणि पुढे जात असलात, तरी तेही वृद्ध होत आहेत हे कधीही विसरू नका. नेहमी त्यांच्याबरोबर वेळ घालवा.”

अक्षय आईवर करायचा खूप प्रेम
अक्षयची आई अरुणा भाटिया त्यांच्या एका जुन्या व्हिडिओमध्ये मुलाबद्दल बोलल्या होत्या. अरुणा भाटिया म्हणाल्या होत्या की, “जेव्हा तो चित्रपट साईन केल्यानंतर आला, तेव्हा त्याने येऊन मला साइनिंगची रक्कम दिली.” म्हणाला की, “आई हे तू ठेव.” मी ही साईन रक्कम माता राणीच्या चरणात ठेवली होती. जेव्हा त्याचा फोटो पहिल्यांदा स्क्रीनवर आला, तो सकाळी ५- ५:३० च्या सुमारास माझ्याकडे आला आणि मी पाहिले की तो रडत आहे. मग अजून जोरात रडू लागला. मी विचारल्यानंतर तो म्हणाला की, हे बघ माझा फोटो आला आहे.”

आईच्या मृत्यूनंतर अक्षयची भावनिक पोस्ट
आईच्या निधनानंतर अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. अक्षयने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमधे आईबद्दल लिहिले की, “ती माझ्या खूप जवळ होती. आज ती आमच्यात नसण्याचे मला खूप दु:ख होत आहे. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला व दुसऱ्या जगात माझ्या वडिलांना भेटायला गेल्या. तुम्ही या काळात मला व माझ्या परिवाराला जो पाठिंबा दिला, त्यासाठी तुमच्या सर्वांचे आभार. ओम शांती.”

अक्षयच्या या पोस्टवरून समजते की, अभिनेत्याच्या आयुष्यात त्याची आई खूप महत्वाची होती. त्याने आपल्या आईवर मनापासून प्रेम केले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुरकुरीत पकोडे पाहून शिल्पाच्या तोंडाला सुटले पाणी, एकटीनेच केले फस्त; थ्रोबॅक व्हिडिओ भन्नाट व्हायरल

-सुपरस्टार नागार्जुन यांची सून समंथाने फ्लॉन्ट केले ऍब्ज; पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

हे देखील वाचा