‘या’ हॉलिवूड चित्रपटात झळकणार अली फजल, ‘३००’ फेम अभिनेता जेरार्ड बटलरसोबत करतोय काम


अभिनेता अली फजल (Ali Fazal) वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जातो. त्याने आपल्या अभिनयाने मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. अलीने आता ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’ आणि ‘डेथ ऑन द नाईल’ नंतरचा हॉलिवूडचा पुढचा प्रोजेक्ट साईन केला आहे. अमेरिकन फिल्ममेकर रिक रोमन वॉचा ऍक्शन चित्रपट ‘कंधार’मध्ये तो अभिनय करताना दिसणार आहे. त्याचे शूटिंगही त्याने सुरू केले आहे. स्कॉटिश अभिनेता जेरार्ड बटलर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात तो टॉम हॅरिस नावाच्या गुप्तहेर सीएआय एजंटची भूमिका साकारत आहे. मात्र, यामध्ये अलीचे पात्र समोर आलेले नाही.

जेरार्ड बटलर (Gerard Butler) हे झॅक स्नायडरच्या ऐतिहासिक ‘३००’ आणि ‘हॅस फॉलन’ सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, हॅरिस शत्रूच्या प्रदेशात अडकला आहे आणि तेथून पळून जाण्यासाठी त्याला एका अफगाण भाषांतरकाराची गरज आहे. जेणेकरून तो येथील सुरक्षा दलांपासून सुटून अफगाण शहरातील एका खास ठिकाणी पोहोचू शकेल.

डिझनीच्या ‘कंधार’च्या लाईव्ह-ऍक्शन रिमेकमध्ये सुल्तान फेम इराणी- अमेरिकन अभिनेता नवी नेघाबान देखील आहे. चित्रपटाची कथा लेखक मिशेल लाफॉर्च्यून यांनी लिहिली आहे, ज्यांनी एक गुप्तचर अधिकारी म्हणून स्वतःचे अनुभव लिहून ठेवले आहेत. चित्रपटाची कथा वॉ आणि बटलरच्या मागील ऐतिहासिक चित्रपटावर आधारित असू शकते. डेडलाइननुसार, ‘कंधार’ हा हॉलिवूडचा पहिला चित्रपट असेल, ज्याचे संपूर्ण चित्रीकरण सौदी अरेबियामध्ये केले जाईल.

हॉलिवूड चित्रपट अद्याप झाला नाही प्रदर्शित
अलीच्या हॉलिवूड चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित केली जात नाहीये. अगाथा क्रिस्टीच्या प्रसिद्ध गुप्तहेर कादंबरीवर आधारित अलीच्या ‘डेथ ऑन द नाईल’ची प्रदर्शन तारीख अनेक वेळा बदलण्यात आली आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार होता, पण कोरोना विषाणूच्या साथीमुळे तो अद्याप प्रदर्शित होऊ शकला नाही.

अली दिसणार अंतराळवीराच्या भूमिकेत
अली फजलने अलीकडेच चित्रपट निर्मात्या आरती कडव दिग्दर्शित त्याच्या ‘फ्युचरिस्टिक स्पेस’ चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे अनावरण केले. अली फजलने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो अंतराळवीराच्या पोशाखात दिसत होता. तो म्हणतो की, या प्रोजेक्टचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही आणि त्याने यापूर्वी कधीही अशी भूमिका साकारली नव्हती. हे करण्यासाठी तो खूप उत्सुक आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लग्नांच्या चर्चांमध्ये कॅटरिना क्लिनिकबाहेर स्पॉट, नेटकरी म्हणाले, ‘लग्नाआधीच प्रेग्नंट झाली की काय?’

-धक्कादायक! अं’मली पदार्थ तस्कराचा पाठलाग चुकवताना प्रसिद्ध माॅडेलचा भीषण अपघात, उपचारादरम्यान मृत्यू

-जुही चावलाने सांगितले केकेआर सामना हरल्यानंतर काय करतो शाहरुख खान


Latest Post

error: Content is protected !!