Tuesday, May 5, 2026
Home साऊथ सिनेमा प्रसिद्ध अभिनेता संतोष नायर यांचा रस्ते अपघातात यांचा मृत्यू

प्रसिद्ध अभिनेता संतोष नायर यांचा रस्ते अपघातात यांचा मृत्यू

संतोष नायर हे एक लोकप्रिय मल्याळम चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेते होते. त्याच्याबाबत एक दु:खद बातमी समोर आली आहे.अभिनेते संतोष के. नायर यांचे निधन झाले आहे. त्यामुळे संपूर्ण इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. मंगळवारी सकाळी केरळमधील अडूर येथे एका रस्ते अपघातात संतोष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संतोष आपल्या पत्नी राजलक्ष्मी यांच्यासोबत प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाची एका ट्रकशी धडक झाली, ज्यात अभिनेत्याचा मृत्यू झाला आणि राजलक्ष्मी गंभीर जखमी झाल्या. तर त्याची पत्नी राजलक्ष्मी या जखमी असुन त्या रुग्णालयात दाखल आहेत.

संतोष के. नायर (nayar)आपल्या पत्नी राजलक्ष्मी यांचा हा अपघात मंगळवारी सकाळी सुमारे 6:30 वाजता पुदुसेरी भागातील अडूर एनाथजवळील एमसी रोडवर घडला. संतोष आपल्या पत्नी राजलक्ष्मी यांच्यासोबत इनोव्हा कारमध्ये होते. कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि समोरून येणाऱ्या पार्सल ट्रकला धडकली. त्यानंतर तेथील रहिवाश्यानी त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांना त्यांना रुग्णालयात नेईपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले.

संतोष के. नायर हे एक लोकप्रिय मल्याळम अभिनेते होते. त्यांना 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले होते आणि मालिकांमध्ये काम केले होते. त्याच्या जाण्याने चित्रपटस्रष्टी हळहळ व्यक्त करत आहे. तर त्याचा मोहिनीअट्टम’  हा चित्रपट लास्ट होते. त्यातील त्याच्या अभिनयाला आणि त्या चित्रपटाला उत्तम प्रंशसा मिळाली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘नागिन 7’मध्ये मोठी चूक, एडिट न केलेला VFX सीन झाला टेलिकास्ट

हे देखील वाचा