Thursday, June 13, 2024

‘३ इडियट्स’मध्ये झाला दुर्लक्षित, मात्र ‘गुड्डू भैय्या’ बनून जिंकली त्याने मनं; वाचा अली फजलचा जीवनप्रवास

‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचे प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडले आहे. या वेब सीरिजमध्ये ‘गुड्डू भैया’ ची भूमिका साकारणाऱ्या अली फजलनेही चाहत्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. ‘मिर्झापूर’च्या दोन्ही सीझनमध्ये अलीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. तो या काळातील प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. आपल्या कारकिर्दीत त्याने आतापर्यंत हॉलिवूड चित्रपटांसह अनेक उत्तम चित्रपट केले आहेत.

अली फजलचा जन्म 15 ऑक्टोबर1980 रोजी, लखनऊमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तो रविवारी (15 ऑक्टोबर) आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. फजल शालेय काळात बास्केटबॉल आणि फुटबॉल खेळ खेळत असे. याच कारणामुळे अली फजलचे शरीर हॉट आणि बऱ्यापैकी फिट आहे. आपले शालेय शिक्षण देहरादून येथील ‘दून’ या प्रसिद्ध शाळेतून पूर्ण केले.

जेव्हा तो 18 वर्षांचा होता तेव्हा त्याचे आईवडील विभक्त झाले. शाळेच्या काळापासून त्याचा अभिनयाकडे कल होता. कदाचित याच कारणामुळे त्याने मुंबईतून पदवी घेतली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने चित्रपटांमध्ये आपले नशीब आजमावण्यास सुरुवात केली. त्याने मॉडेलिंगला सुरुवात केली. ॲथलीट असण्याव्यतिरिक्त, त्याला गिटार वाजवायलाही आवडते. तो एक उत्कृष्ट गिटार वादक आहे.

अली फजलला चांगल्या कविताही लिहिण्याची आवड आहे. त्याने लिहिलेली कविता अतिशय भावनिक असते. जेव्हा जेव्हा अलीला वेळ मिळेल तेव्हा तो कविता लिहितो. या सर्व छंदांव्यतिरिक्त अलीला प्रवास करायला आवडते. शूटिंग संपताच तो फिरायला निघतो. त्याला जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यायला आवडतो. त्याला आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जायचा आहे.

अली फजलने 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द अदर ऍंड द लाइन’ चित्रपटात प्रथम छोटी भूमिका केली. यानंतर 2009 मध्ये तो राजकुमार हिरानीच्या ‘3 इडियट्स’ चित्रपटातही दिसला. या चित्रपटात तो एका छोट्या भूमिकेतही होता. त्यावेळी चित्रपटात तो जास्त नोटिस झाला नव्हता. 2011 मध्ये तो ‘ऑलवेज कभी-कभी’ चित्रपटात नायक म्हणून दिसला. पण हा चित्रपट चालला नाही. त्यानंतर 2013 मध्ये ‘फुकरे’ हा चित्रपट आला. अली फजलच्या अभिनय कारकिर्दीला या चित्रपटातून गती मिळाली. यासोबतच तो अभिनेत्री ऋचा चड्डाच्याही जवळ आला आहे.

हेही नक्की वाचा-
खुद्द मोदींनी लिहिलेल्या गरब्याला ‘या’ गायिकेने दिलाय आवाज; पंतप्रधानांनी ट्विट करून मानले आभार
‘३ इडियट्स’ चित्रपटात काम केल्यानंतर अली फजल खरंच बनला होता डिप्रेशनचा शिकार; ‘हे’ होते कारण

हे देखील वाचा