दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचे कोट्यवधी चाहते आहेत. त्याचे चाहते त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या स्टाईलचेही चाहते आहेत. त्यामुळेच चाहते त्याला प्रेमाने ‘स्टायलिश स्टार’ अल्लू अर्जुन म्हणून ओळखतात. त्याचे वडील आणि आजोबा प्रसिद्ध कलाकार होते. अल्लूची पत्नी स्नेहादेखील प्रसिद्ध अभिनेत्री राहिली आहे. तसेच त्याचा भाऊ अल्लू सिरीशनेही इंडस्ट्रीत चांगले नाव कमावले आहे. आता अभिनेत्याची पुढची पिढी म्हणजेच त्याची मुलगी आरहादेखील चित्रपटात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.
अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू आरहा अवघ्या ५ वर्षांची आहे. मात्र, लवकरच ती आपल्या आई- वडिलांप्रमाणे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपले नाव बनवणार आहे. खरं तर आरहा लवकरच दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीसोबत तिच्या आगामी ‘शकुंतलम’ चित्रपटात काम करताना दिसणार आहे. (Actor Allu Arjun Daughter Allu Arha Debut Samantha Akkineni Movie Shakuntalam)
अल्लू अर्जुनने फोटो शेअर करत ‘शकुंतलम’ चित्रपटाच्या निर्मात्यांना धन्यवाद दिला आहे. त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “अल्लू कुटुंबासाठी ही अभिमानास्पद बाब आहे की, कुटुंबाची चौथी पिढी अल्लू आरहा शकुंतलम चित्रपटातून पदार्पण करत आहे. मी गुणा शेखर आणि नीलिमा गुणाला धन्यवाद देऊ इच्छितो, ज्यांनी या सुंदर चित्रपटात माझ्या मुलीला पदार्पण करण्याची संधी दिली. समंथा अक्किनेनीनेसोबत माझ्या चित्रपटाचा प्रवास खूपच खास राहिला आहे. त्यामुळे मी हे पाहून खूप खुश आहे की, आरहा, समंथासोबत तिचे पदार्पण करत आहे. शकंतुलमच्या पूर्ण कास्ट आणि क्रूला माझ्याकडून शुभेच्छा.”
समंथा अक्किनेनीने केली अल्लू अर्जुनच्या मुलीची प्रशंसा
शकुंतलम चित्रपटातील मुख्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीने आपली सहअभिनेत्री आरहाची प्रशंसा केली आहे. समंथाने इंस्टाग्राम स्टोरीवर अल्लू अर्जुनची पोस्ट शेअर करत लिहिले की, “तिने पहिल्याच टेकमध्ये योग्य अभिनय केला. आपले सर्व डायलॉग्ज एकदम बरोबर बोलले. आरहा नक्कीच सुपरस्टार बनेल. देव आरहाला आशीर्वाद देवो.”

समंथाने गुणा शेखरचा चित्रपट शकुंतलमच्या दुसऱ्या स्केड्युलची शूटिंग २८ जूनपासून हैदराबादमध्ये सुरू झाली आहे. शकुंतलम चित्रपट, शकुंतलम आणि दुष्यंतच्या प्रेम कहाणीवर आधारित आहे, ज्यामध्ये मल्याळम अभिनेता देव मोहन दिसणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-पवनदीप राजनच्या आवाजाचे केले करिश्मा कपूरने कौतुक; परफॉर्मन्सच्या मध्येच पोहोचली स्टेजवर