Thursday, July 18, 2024

‘आज माझ्या ‘या’ पहिल्या बॉलिवूड चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण’, म्हणत सिद्धार्थ जाधवने दिला आठवणींना उजाळा

मराठी चित्रपटसृष्टीत एक असा अभिनेता आहे, ज्याला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण त्याला ओळखतात. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, तो अभिनेता कोण आहे? तो अभिनेता इतर कुणी नसून आपल्या सर्वांचा लाडका ‘सिद्धू’ अर्थात सिद्धार्थ जाधव होय. सिद्धार्थने आपल्या अभिनयाच्या जादूने चाहत्यांच्या मनात मानाचे स्थान निर्माण केले आहे. आपल्या विनोदाने तर त्याने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले आहे. अभिनयाने चित्रपटसृष्टी गाजवणारा सिद्धू सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. तो नेहमीच आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शेअर करत असतो. अशातच आता त्याची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. यामध्ये त्याने आपल्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाबाबत सांगितले आहे.

खरं तर सिद्धार्थने सन 2006 साली आलेल्या ‘गोलमाल: फन अनलिमिटेड’ चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले होते. त्याच्या या चित्रपटाला बुधवारी (14 जुलै) 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सिद्धार्थने या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो आपल्या या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाबाबत सांगत आहे. (Marathi actor siddharth jadhav shares A Memory of His First Bollywood Movie Golmaal)

सिद्धार्थने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “आज माझ्या गोलमाल या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. तुम्हा सगळ्यांचे‌ मनापासून‌ आभार.”

सिद्धार्थच्या या पोस्टला जबरदस्त पसंती मिळत आहे. आतापर्यंत या पोस्टला १० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. सोबतच शेकडो कमेंट्सचाही वर्षाव होत आहे.

सिद्धार्थच्या कारकिर्दीविषयी बोलायचं झालं, तर सन २००४ साली आलेल्या ‘अगं बाई अरेच्छा!’ हा त्याचा पहिलाच सिनेमा होता. यानंतर त्याने ‘जत्रा’, ‘जबरदस्त’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘दे धक्का’, ‘गलगले निघाले’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हुप्पा हुय्या’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘कुटुंब’, ‘फास्टर फेने’, ‘जत्रा’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘दे धक्का’, ‘हुप्पा हुय्या’, ‘टाईम प्लीज’, ‘धुरळा’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे.

त्याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्याला बॉलिवूडमधून ही ऑफर आल्या. त्याने ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘सिटी ऑफ गोल्ड’, ‘राधे’ आणि ‘सिंबा’ या हिंदी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘सिंबा’ चित्रपटात त्याने रणवीर सिंगसह पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त सिद्धार्थने मिथुन चक्रवर्ती अभिनित बंगाली चित्रपटातही काम केले आहे.

हे देखील वाचा