कलाविश्वाला मंगळवारी (दि. २३ ऑगस्ट) जबर धक्का बसला. टीव्ही अभिनेत्री आणि बीजेपी नेत्या असलेल्या सोनाली फोगाट हिचे निधन झाले. तिच्या निधनाने फक्त कलाविश्वालाच नाही, तर राजकीय जगावरही शोककळा पसरली. सोनाली सोशल मीडियावर तुफान प्रसिद्ध होती. ती तिच्या फोटो आणि मजेशीर व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असायची. मात्र, तिच्या जाण्याने चाहते दु:खात आहेत. गोवा येथे हृदयविकाराचा झटका आल्याने सोनालीचे निधन झाले. ही बातमी काही क्षणातच वाऱ्यासारखी पसरली. याचा परिणाम टीव्ही अभिनेता अली गोनी याच्यावरही झाला. त्याला विश्वासच बसत नाहीये की, सोनालीचे निधन झाले आहे.
सोनाली फोगाट (Sonali Phogat) हिने खूप कमी काळात प्रसिद्धी मिळवली होती. तिने ही प्रसिद्धी ‘बिग बॉस १४’ या रियॅलिटी शोमधून मिळवली होती. यादरम्यान तिने सर्वांचे लक्ष तेव्हा वेधले होते, जेव्हा तिचे नाव तिच्या सहस्पर्धक अली गोनी (Aly Goni) याच्यासोबत जोडले गेले होते. अली गोनी आणि सोनाली फोगाट (Aly Goni And Sonali Phogat Relationship) यांचे नाते खूप जास्त काळ चर्चेत राहिले होते. मात्र, अलीकडून सोनालीसाठी कोणत्याही भावना नसल्या, तरीही तिने जाहीररीत्या सांगितले होते की, तिच्या मनात अली गोनीविषयी भावना आहेत.
सोनालीच्या निधनावर काय म्हणाला अली गोनी?
‘बिग बॉस’ या शोनंतरही सोनालीचे अली आणि त्याची गर्लफ्रेंड जॅस्मिन भसीन (Jasmin Bhasin) यांच्यासोबत चांगले नाते होते. सोनालीच्या निधनानंतर अली गोनी पूर्णपणे तुटला आहे. त्याने माध्यमांशी चर्चा करताना सांगितले की, त्याला याबाबत माहितीच नव्हते की, सोनालीचे निधन झाले आहे. त्याने यावर आश्चर्य व्यक्त केले. तसेच, असेही विचारले की, हे सर्व बिग बॉस १४मधील सोनाली फोगाटबद्दल बोलले जात आहे का? यावरून स्पष्ट होते की, अली गोनी याला सोनालीच्या निधनामुळे मोठा धक्का बसला आहे.
अली गोनी याने ‘खतरा खतरा खतरा’, ‘ये हैं मोहब्बतें’, ‘नागिन’, ‘ये कहा आ गये हम’ यांसारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. दुसरीकडे, सोनालीबद्दल बोलायचं झालं, तर ती तिच्या टिकटॉक व्हिडिओंमुळे चांगलीच चर्चेत असायची. चाहत्यांनाही तिचे व्हिडिओ खूप आवडायचे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वयाने १२ वर्षे लहान अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती सोनाली फोगाट, वाचा किस्सा
सपना चौधरी विरोधात अटक वारंट जारी, पाहा काय आहे प्रकरण
सोनाली फोगाटचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल, काही तासांपूर्वीच केली होती अखेरची पोस्ट