Thursday, December 4, 2025
Home बॉलीवूड अमिताभ बच्चन आणि नितीन गडकरी यांच्या भेटीमुळे रंगल्या चर्चा, ‘या’ गोष्टीसाठी मिळवला हात

अमिताभ बच्चन आणि नितीन गडकरी यांच्या भेटीमुळे रंगल्या चर्चा, ‘या’ गोष्टीसाठी मिळवला हात

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी गुरुवारी (दि. १८ ऑगस्ट) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यादरम्यान, नितीन गडकरी यांनी भारतातील राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियानाला पाठिंबा देण्यासाठी अमिताभ यांची मदत मागितली आहे. त्यांनी या अभियानासाठी समर्थन मागितले आहे. खरं तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानुसार, भारतात प्रत्येक वर्षी जवळपास ८० हजार लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात, हे जगात होणाऱ्या मृत्यूच्या १३ टक्क्यांइतके आहे.

वाहन चालवताना निष्काळजीपणामुळे किंवा रस्ता सुरक्षाबद्दल जागरूकता कमी असल्याने सर्वाधिक अपघात घडतात. त्यामुळेच इतर मूलभूत जीवनावश्यक गरजांइतकीच रस्ते सुरक्षाबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे सर्वात महत्त्वाचे आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे उद्दिष्ट दरवर्षी रस्त्यांवर मारल्या जाणाऱ्या आणि जखमी होणाऱ्या लोकांची संख्या कमी करण्यासाठी, लोकांना रस्ता सुरक्षेची माहिती देणे हा आहे.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे दरवर्षी सामाजिक मुद्द्यांशी जोडले गेले आहेत. यामध्ये पल्स पोलिओ अभियान, मुलींचे शिक्षण आणि स्वच्छ भारत अभियान यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अमिताभ हे सध्या सोनी टीव्हीवरील रियॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ या शूटिंगमध्येही व्यस्त आहेत.

कोणत्या सिनेमात दिसणार अमिताभ बच्चन?
याव्यतिरिक्त अमिताभ बच्चन हे ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा येत्या ९ सप्टेंबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ब्रह्मास्त्र सिनेमानंतर अमिताभ हे लवकरच ‘गुड बाय’ सिनेमात दिसणार आहेत. यामध्ये रश्मिका मंदाना, नीना गुप्ता आणि पावेल गुलाटी यांच्याही भूमिका आहेत.

अमिताभ यांची कारकीर्द
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात १९६९ साली प्रदर्शित झालेल्या ‘सात हिंदुस्तानी’ या सिनेमातून केली होती. त्यानंतर १९७१ मध्ये ते ‘आनंद’ या सिनेमात दिसले होते. यामध्ये त्यांनी ‘डॉ. भास्कर के. बॅनर्जी’ म्हणजेच बाबू मोशाय या भूमिकेत झळकले होते. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. यानंतर त्यांनी २००हून अधिक सिनेमात काम केले. वयाच्या ७९ वर्षीही ते सिनेमात त्याच जोशाने काम करताना दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘तारक मेहता…’मधील ‘या’ अभिनेत्रीला पहिल्या भेटीतच बॉयफ्रेंडने केलेली घाणेरडी मागणी, तिनेही…
दहा वर्षात अफाट यश मिळवूनही सनी लिओनी हळहळली; म्हणाली, ‘आजपण अनेकजणांना माझ्यासोबत…’
कॅनेडियन निर्मात्यासाठी ‘द कश्मीर फाइल्स’ म्हणजे ‘कचरा’, म्हणाला, ‘ऑस्करला गेल्यास भारतासाठी…’

हे देखील वाचा