हिंदी चित्रपटसृष्टीतील लाेकप्रिय अमिताभ बच्चन हे त्यांच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. अमिताभ बच्चन हे आपल्या अभिनयाच्या जाेरावर फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. सध्या अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती‘चा 14वा सीझन होस्ट करत आहेत. या वेळी, 11 ऑक्टोबरला अमिताभ बच्चन 80 वर्षांचे होतील अशात शोच्या निर्मात्यांनी अभिनेत्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केले, ते पाहून अमिताभ बच्चन भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले.
‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati)चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) शो होस्ट करण्यासाठी येतात आणि अचानक असे काही घडते की, ते भावूक हाेतात. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अमिताभ बच्चन शो होस्ट करण्यासाठी येताच हॉर्न वाजताे, जाे शोच्या शेवटी वाजवला जाताे. अशा परिस्थितीत बिग बी आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात, “आजचा खेळ लवकर संपला.”
तितक्यातच मागून अमिताभ बच्चनचा ‘कभी मेरे दिल में ख्याल आता है’ या डायलॉगचा आवाज येतो आणि अभिषेक बच्चन शोमध्ये प्रवेश करतो. शोमध्ये मुलाला पाहून बिग बी आनंदाने उडी मारतात आणि अभिषेकला घट्ट मिठी मारतात. मुलाला मिठी मारल्यानंतर बिग बी देखील खूप भावूक होतात आणि त्यांचे अश्रु अनावर हाेते. हा एपिसोड 11 ऑक्टोबरला अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसारित हाेणार आहे.
View this post on Instagram
साेनी टीव्हीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “केबीसीच्या मंचावर असे काही क्षण आले की, इतरांच्या डाेळ्यातील अश्रू पुसणारे अमिताभ बच्चन यांच्या डाेळ्यात अश्रू.” चाहत्यांनाही हा प्रोमो व्हिडीओ चांगलाच आवडला आहे. एका यूजरने लिहिले की, “या एपिसोडची वाट पाहू शकत नाही”, तर दुसऱ्याने लिहिले की, “तुम्ही दोघे बापलेक खूप छान आहात.” त्याचबरोबर काही लोक बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर त्यांचा ‘गुडबाय’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, या चित्रपटातून दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मीका मंदान्ना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय ‘उच्छाई’ हा अमिताभ यांचा आगामी चित्रपट आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आलियाचा मोठा खुलासा! पती रणबीर नाही, तर ‘ही’ व्यक्ती ठेवते बँकेतील पैशांचा हिशोब
राडाच! विजयादशमीनिमित्त मंडपामध्ये ढाक वाजवताना दिसली अभिनेत्री, पाहा व्हायरल व्हिडिओ