बाॅलिवूडचे लाेकप्रिय अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही विजयादशमीनिमित्त दुर्गा पूजा मंडपामध्ये लोकांची सेवा करताना दिसली. नव्या नवेली नंदाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती विजयादशमीचा सण साजरा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ साेशल मीडियावर येताच प्रचंड व्हायरल हाेत आहे. या व्हिडिओवर चाहते प्रचंड प्रेमाचा वर्षाव करत आहे. यावर अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
व्हिडिओमध्ये नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) तबला वाजवताना दिसत आहे. याशिवाय मंडपमध्ये येणाऱ्या भाविकांना ती प्रसाद वाढतांना दिसत आहे. यासाेबतच ती डान्स देखील करताना दिसत आहे. विजयादशमीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी हाेऊन ती खूप आनंदी दिसत आहे. व्हिडिओवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे. या व्यतिरिक्त व्हिडिओवर आई श्वेता बच्चन आणि तिचे मामा अभिषेक बच्चन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. बुधवारी व्हिडिओ शेअर करत नव्याने लिहिले, ‘विजयादशमीच्या शुभेच्छा.’ याशिवाय तिने एक इमोजीही शेअर केला आहे.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये नव्या नवेली नंदाने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला असून ती पूजा मंडपमध्ये नाचत आहे. यानंतर ती तबला वाजवतांना दिसत आहे. तर शेवटच्या सीनमध्ये ती भाविकांना प्रसाद वाटताना दिसत आहे. नव्याचे मामा अभिषेक बच्चन यांनी लिहिले, “मेस.” याला प्रतिउत्तर देताना नव्याने लिहिले, “मग तुम्ही हे करा.” श्वेता बच्चनने कमेंट करत लिहिले की, “शुभ विजया नव्या.”
View this post on Instagram
नव्या नवेली नंदा हिने व्यवसाय करण्याचा घेतला निर्णय
नव्या नवेली नंदा ही श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांची मुलगी असुन ती अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची नात आहे. तिने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला असुन अलीकडेच तीने ‘व्हॉट द हेल’ या नावाने पॉडकास्ट सुरू केले आहे, ज्यामध्ये ती तिची आई श्वेता आणि आजी जया यांच्याशी विविध विषयांवर बोलत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘ओय ओय गर्ल’ने थाटलेला 17 वर्षांनी मोठ्या असलेल्या दिग्दर्शकासोबत संसार, पण झालं लईच वाईट
‘आदिपुरुष’ चित्रपटातील ‘या’ चुकांना तम्हीही केले आहे का दुर्लक्षित? जाणून घ्या एका क्लिकवर