Thursday, November 30, 2023

काय सांगता! ट्रेंड होत असलेल्या ‘मेरा दिल ये पुकारे’ गाण्यावर अमिताभ 1999मध्येच थिरकलेले? पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याची कोणालाही कल्पना नसते. एखाद्या गाण्यावर कुणीतरी डान्स करतं, आणि तो डान्स नेटकऱ्यांना इतका भावतो की, मग तो ट्रेंड बनतो आणि त्याप्रमाणे व्हिडिओ बनवले जातात. असाच मागील काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तिने बॉलिवूडच्या ‘मेरा दिल ये पुकारे आजा‘ या गाण्यावर डान्स केला होता. यानंतर सामान्य लोकांसोबतच प्रसिद्ध अभिनेत्यांनीही तिच्या स्टेप्स कॉपी केल्या. हा डान्स व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडू लागला. आता लोकांनी क्रिएटिव्हिटी वापरत अमिताभ बच्चन यांना पाकिस्तानी मुलीच्या अंदाजात या गाण्यावर थिरकताना दाखवले आहे.

बॉलिवूडचे ‘महानायक’, ‘बिग बी’, ‘शहेनशाह’ अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाणारे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. मात्र, इथे एक रंजक ट्विस्ट आहे. खरं तर, हा व्हिडिओ अमिताभ यांच्या ‘सूर्यवंशम’ सिनेमातील एक छोटी क्लिप आहे. यामध्ये भूमिका निभावत असलेले अमिताभ पाकिस्तानी मुलीच्या अंदाजात थिरकताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, ज्याने हा व्हिडिओ बनवला आहे, त्याने क्रिएटिव्हिटी दाखवत या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ हे गाणे लावले. यामुळे असे वाटत आहे की, अमिताभ खरोखरच या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करत आहेत.

व्हिडिओ जोरदार व्हायरल
इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 12 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. याव्यतिरिक्त 3 हजारांहून अधिक चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षावही केला आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स
नेटकरी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तर अमिताभ यांनी केलेल्या कार्यक्रम आणि जाहिरातींमधील त्यांचा डायलॉग आहे तसा इकडे वापरला आहे. एकाने लिहिले की, “देखा आपने लापरवाही का नतीजा.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “देवियों और सज्जनों आप सभी का स्वागत करता हूं.” आणखी एकाने लिहिले की, “असे कोणतेही काम नाही जे बाबूजींनी केले नाहीये.”

 

View this post on Instagram

 

A post shared by AYESHA (@oyee_ayesha)

सन 1999मध्ये रिलीज झालेला ‘सूर्यवंशम’
खरं तर, अमिताभ बच्चन यांचा ‘सूर्यवंशम’ (Sooryavansham) हा सिनेमा सन 1999मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात अमिताभ यांनी भानूप्रताप हे पात्र साकारले होते. या सिनेमावर वेगवेगळे मीम्स बनत असतात. सध्या नेटकरी व्हायरल होत असलेल्या अमिताभ यांच्या व्हिडिओची मजा लुटत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकीकडे ‘भगव्या बिकिनी’चा वाद अन् दुसरीकडे सनीने समुद्रकिनारी केशरी रंगाच्या ड्रेसमध्ये दिल्या कामुक पोझ
भल्याभल्यांनी केले ट्रोल, पण दीपिका राहिली हिमालयासारखी उभी; फीफा विश्वचषकात उंचावली भारतीयांची मान

हे देखील वाचा