Monday, June 17, 2024

मजबूत जॉन अमिताभ यांच्याशी बोलताना लागला रडू, अभिनेत्याला पाहून उपस्थितांच्याही डोळ्यात तरळले अश्रू

कौन बनेगा करोडपती 13‘ च्या मंचावर दर शुक्रवारी खास पाहुणे हजेरी लावतात. शानदार शुक्रवार या आगामी शोमध्ये ऍक्शन हिरो जॉन अब्राहम दिसणार आहे. रफ-टफ अभिनेता जॉन त्याच्या आगामी ‘सत्यमेव जयते 2‘ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहे. जॉनसोबत चित्रपटातील अभिनेत्री दिव्या खोसला कुमारही उपस्थित राहणार आहे. शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासमोर जॉन जेव्हा रडतो, तेव्हा मस्ती आणि मनोरंजन यातील अंतर गंभीर होते. जेव्हा चॅनलने या शोचा प्रोमो प्रदर्शित केल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

प्रोमो व्हिडिओमध्ये जॉन, दिव्या खोसला कुमार आणि अमिताभ बच्चन ‘केबीसी 13’ च्या मंचावर एकत्र येताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये जॉन ऍक्शन दाखवताना दिसत आहे, तर अमिताभ गंमतीने म्हणतात की, “अरे मारशील का?” यानंतर जॉन त्याच्या एका बोटावर फुटबॉल डान्स करत, पायाने खेळताना ट्रिक्स दाखवतो. पुढच्या फ्रेममध्ये जेव्हा ऍक्शन हिरो त्याचे सिक्स पॅक ॲब्स प्रेक्षकांसमोर दाखवतो, तेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवू लागतात. पुढे अमिताभ फक्त महिलांचा आवाज ऐकू येतो, असे म्हणताना दिसतात. यावर दिव्याही हसू लागते.

हॉट सीटवर बसून जॉन एक किस्सा सांगताना दिसत आहे. जॉन अमिताभ यांना सांगतो की, “धूम’नंतर मी मोटरसायकलवरून तुमच्या घरी आलो, तेव्हा तुम्ही म्हणाला की, अभिषेकला एनकरेज करू नकोस. जेव्हा अभिषेक खाली आला, तेव्हा तुम्ही म्हणाला की, ‘वाह काय बाईक आहे?” जॉनची ही गोष्ट ऐकून बिग बींनी टाळ्या वाजवल्या आणि हसले.

लोखंडासारखा मजबूत जॉन अब्राहम शोमध्ये अचानक वितळताना दिसतो. जॉनचे डोळे भरून येतात आणि तो हाताने अश्रू पुसताना दिसतो. दिव्या खोसला कुमार आणि अमिताभ बच्चन यांनाही या रफ-टफ अभिनेत्याला रडताना पाहून वाईट वाटते. (kbc 13 john abraham get emotional in front of amitabh bachchan video viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या जॉन अब्राहमने वाजवली होती चाहत्याच्या कानाखाली; पण काय होतं कारण?

कामाप्रती समर्पण असावं तर असं, गेल्या 18 वर्षात जॉन अब्राहमने कामातून घेतली केवळ तीन वेळा सुट्टी

हे देखील वाचा