Monday, June 17, 2024

माधुरीने केला पाकिस्तानी मुलीचा डान्स कॉपी; भडकलेले नेटकरी म्हणाले, ‘तुझ्यापेक्षा तीच भारी’

सोशल मीडियावर एखादी गोष्ट ट्रेंड झाली की, त्यावर हजारो व्हिडिओ तयार केले जातात. यामध्ये कलाकारही मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ बनवतात. सध्या ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ या गाण्याचा फिव्हर सोशल मीडिया युजर्सवर झाल्याचे दिसते. या गाण्यावर आयेशा या पाकिस्तानी मुलीचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तेव्हापासून हे गाणे इंस्टाग्राम रील्सवर ट्रेंड होत आहे. फक्त मुलीच नाही, तर मुलेही आयेशाप्रमाणे डान्स करत व्हिडिओ शेअर करत आहेत. आता या यादीत बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचेही नाव सामील झाले आहे.

माधुरी दीक्षितने पाकिस्तानी मुलीचा डान्स केला कॉपी
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिने ‘मेरा दिल ये पुकारे आजा…’ या गाण्याचा व्हायरल ट्रेंड फॉलो करत आपला एक व्हिडिओ शेअर केला  आहे. या व्हिडिओत माधुरी पाकिस्तानी मुलगी आयेशाच्या डान्स मूव्हज कॉपी करताना दिसत आहे. माधुरी यामध्ये पूर्ण लयीत डान्स करत आहे. तिने या ट्रेंडमध्ये आपले पूर्ण योगदान दिल्याचे दिसते. व्हायरल गाण्यावरील माधुरीचा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना भलताच आवडला आहे. मात्र, काही नेटकऱ्यांनी माधुरीला या गाण्यावरील डान्समुळे जोरदार ट्रोल केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

काय म्हणाले युजर्स?
एका युजरने माधुरीच्या डान्सची व्हायरल गर्ल आयेशा (Ayesha) हिच्या डान्सशी तुलना करत लिहिले की, “मॅडम माफ करा, तिच्यापेक्षा चांगला डान्स नाहीये.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “मॅडम कृपया करून हा ट्रेंड नको.” आणखी एका युजरने लिहिले की, “हा ट्रेंड आता त्रासदायक बनला आहे.” एक तर असा म्हणाला की, “तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by AYESHA (@oyee_ayesha)

कोण आहे व्हायरल गर्ल?
व्हायरल व्हिडिओत डान्स करताना दिसत असलेली मुलगी पाकिस्तानची आहे. तिचे नाव आयेशा असे आहे. ती एक टिकटॉकरही आहे. तिने तिचा डान्स व्हिडिओ 11 नोव्हेंबर रोजी इंस्टाग्रामवर शेअर केला होता. हा व्हिडिओ कोणत्यातरी लग्नात शूट गेल्याचे दिसते. आयेशाचा हा व्हिडिओ पाहता पाहता एवढा व्हायरल झाला की, यावर आता सामान्य जनतेपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण हा डान्स रीक्रिएट करत आहेत. (actress madhuri dixit trolled for recreating pakistani viral girl dance on mera dil yeh pukare aaja)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
वडिलांवरील आर्थिक संकटं आठवून रडला आमिर खान; म्हणाला, ‘अब्बाजानला पाहून खूपच…’
कलाविश्व हादरले! प्रसिद्ध अभिनेत्याच्या बिल्डिंगमध्ये आगीचे तांडव, जीव वाचवण्यासाठी मुलीने मारली उडी

हे देखील वाचा