Saturday, June 29, 2024

बाबाे! उंटांमध्ये शूटिंग करताना अमिताभ बच्चन झाले होते जखमी, बिग बींनी खुद्द केला खुलासा

कलाकार असाच मोठा बनत नसतो. त्यामागे त्याचे अतोनात कष्ट, जिद्द, कामाविषयी असलेली अफाट इच्छाशक्ती असते. या सर्व गोष्टींनंतर तेव्हा कुठे त्याला यशाची चव चाखायला मिळत असते. असेच काहीसे आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्याबद्दल, ज्यांना आपण ‘बिग बी’, ‘शहेनशाह’, ‘अँग्री मॅन’ या नावांनी ओळखतो. तो अभिनेता इतर कुणी नसून अमिताभ बच्चन हे आहेत. मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती‘च्या सेटवर शूटिंगशी संबंधित एक जुना अनुभव सांगितला.

अभिनेत्याने सांगितले की, “एकलव्य: द रॉयल गार्ड’ या ऍक्शन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांनां उंटांच्या कळपात उडी मारावी लागली. सुमारे 30-40 उंट धावत होते आणि त्यापैकी एकाने त्यांच्या डोक्यावर लाथ मारल्याचे त्यानी सांगितले.”

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर या घटनेचा उल्लेख केला. पंजाबमधील जालंधर येथील पशुवैद्य डॉ. रोहित गुप्ता जेव्हा हॉटसीटवर बसले होते तेव्हा त्यांनी बिग बींना त्यांच्या प्राण्यांविषयीच्या ज्ञानाने प्रभावित केले. त्यांनी गायीच्या आवाजाच्या मोड्युलेशनवर संशोधन केले असून उंटाच्या दुधाचे फायदेही सांगितले आहेत.

त्याचे ऐकल्यानंतर बिग बींनी एका चित्रपटासाठी उंटांसोबत शूटिंग करतानाचा त्यांचा अनुभव शेअर केला आणि शूटिंगदरम्यान ते कसे जखमी झाला हे सांगितले, तरीदेखील चित्रपटाच्या सेटवर कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्यांना असे वाटले की, ते फक्त अभिनय करत आहेत.

नंतर, स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना सांगितले की, त्यांची पत्नी त्यांची खूप मोठी फॅन आहे आणि केबीसीच्या सेटवर त्यांना पाहून ती खूप उत्साहित होती. ते म्हणाले, “माझ्या पत्नीची इच्छा होती की, मी हॉटसीटवर उशिरा बसावे आणि जेव्हा मी कारण विचारले तेव्हा तिने सांगितले की, तिला अमिताभ बच्चन यांना आणखी वेळ बघायला मिळेल. हॉटसीटवर येण्याचा अनुभव सांगताना ते म्हणाले, ‘केबीसी’वर येण्यापेक्षा मोठा अनुभव मी कल्पना करू शकत नाही. मी सातव्या स्वर्गात असल्यासारखे मला वाटले. ते खूप भारी होते. माझा हा क्षण मी कधीही विसरणार नाही.”

‘कौन बनेगा करोडपती’ सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऋषी सुनक यांच्यावर बायोपिक बनवण्यासाठी जोरदार मागणी, अक्षय कुमारपासून सिद्धार्थ मल्होत्रापर्यंत ही नावे चर्चेत

सिनेसृष्टीतील ‘हे’ बहीण- भाऊ एकमेकांवर ओवाळून टाकतात जीव, पाहा भन्नाट फाेटाे

हे देखील वाचा