Thursday, July 18, 2024

सिनेसृष्टीतील ‘हे’ बहीण- भाऊ एकमेकांवर ओवाळून टाकतात जीव, पाहा भन्नाट फाेटाे

सिनेसृष्टीत असे अनेक सेलिब्रिटी बहिण भाऊ आहेत जे त्यांच्या अभिनया व्यतिरिक्त त्यांच्या बाँडिंगमुळेही चर्चेत असतात.  हे लोक एकमेकांशी जितके भांडतात तितकेच एकमेकांची काळजी पण घेतात. भाऊबीजनिमित्ताने अशाच काही बॉलीवूडच्या सेलिब्रिटी स्टारवर नजर टाकूयात, ज्यानी धुमधड्याकात भाऊबीज हा सण साजरा केला. 

मेगास्टार अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांची लेक श्वेता नंदा (shweta bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (abhishek bachchan) यांचे एकमेकांशी खूप चांगले नाते आहे. अनेकदा दोघेही एकमेकांचे जुने फोटो शेअर करत असतात. अभिषेकला अनेकदा महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्या ताईंचा सल्ला घेणे आवडते. अलीकडेच श्वेताने भाऊबीजनिमित्त स्वतःचे आणि अभिषेकची एक खोडकर प्रतिमा शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by S (@shwetabachchan)

प्रियांका चोप्रा तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राला प्रत्येक पावलावर साथ देते. ती अनेकदा सिद्धार्थसोबतचे फोटो शेअर करत असते. भाऊबीजनिमित्त तिने सिद्धार्थचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Priyanka brother
photo courtesy: instagram/priyankachopra

सुहाना, आर्यन आणि अबराम खान यंग जनरेशनमध्ये सर्वात लोकप्रिय स्टार किड आहेत. या तिघांचे बाँडिंग अनेकदा फोटोंमधून दिसून येते. मोठा भाऊ म्हणून आर्यन खूप प्रोटेक्टिंग आहे आणि दोघांची खूप काळजी घेतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

सोहा अली खानने भाऊ सैफ अली खानसोबत भाऊबीजेचा एक व्हिडिओ शेअर करून भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Soha (@sakpataudi)

चित्रपट निर्माती आणि टीव्हीची क्वीन एकता कपूरने भाऊबीजनिमित्त भावाल ओवाळले आणि भाऊबीजेच्या शुभेच्छा देत तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by EktaaRkapoor (@ektarkapoor)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddhanth Kapoor (@siddhanthkapoor)

बॉलीवूड अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत कपूर आणि मुलगी श्रद्धा कपूर यांनीही भाऊबीजेला खूप धमाल केली.पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये श्रद्धा कपूर खूपच सुंदर दिसत होती तर जांभळ्या कुर्त्यामध्ये सिद्धांतचा लूकही मस्त दिसत होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सारा अली खानवर भारी पडली साउथची सुंदरी, विकी कौशलच्या चित्रपटात झळकणार ‘ही’ अभिनेत्री

वयाच्या 46 व्या वर्षीही तितकीच फिट आहे पूजा, आजही ‘इतक्या’ प्रचंड संपत्तीची आहे मालकिण

हे देखील वाचा