Friday, July 5, 2024

मोठे महानायक आपला मोठेपणा दाखवा हीच ‘प्रतिक्षा’! अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर मनसेची पोस्टरबाजी

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ या बंगल्यावर कारवाई चालू आहे. मुंबई महानगर पालिकेने या बंगल्यावर कारवाई केली आहे. अमिताभ बच्चन यांच्या जुहू चौपाटी या ठिकाणी असलेला प्रतीक्षा बंगल्याचा काही भाग रस्ता रुंदीकरणासाठी वापरला जाणार आहे. या संदर्भात अमिताभ बच्चन यांना 2017 साली नोटीस देखील पाठवली होती. आता महाराष्ट्र ‘नव निर्माण सेनेचे’ अध्यक्ष मनीष धुरी यांनी अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्या बाहेर पोस्टरबाजी केली आहे.

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर लावलेल्या या पोस्टरवर त्यांनी लिहिले आहे की, “मोठे महानायक आपला मोठेपणा दाखवा हीच प्रतीक्षा. (बिग बी शो योर बिग हार्ट)” तसेच अमिताभ बच्चन यांनी संत ज्ञानेश्वर मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी मुंबई महानगर पालिका आणि जनतेला सहकार्य करावे, असे त्या पोस्टरवर लिहिले आहे.

मुंबई महानगर पालिका अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतीक्षा बंगल्याची एक भिंत पाडण्याच्या तयारीत आहेत. यासाठी 2017 सालीच बीएमसीने अमिताभ बच्चन यांना नोटीस पाठवली होती. परंतु अजूनही या संदर्भात त्यांच्याकडून कोणतेच उत्तर आले नाही.

बिग बी यांच्या घरासमोरील हा रस्ता आता 45 फूट रुंद आहे. महानगर पालिकेला हा रस्ता वाढवून 60 फूट इतका रुंद करायचा आहे. त्यांच्या घरासमोर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे महानगर पालिकेने हा निर्णय घेतला आहे. या प्रकारासाठी अमिताभ बच्चन से न्यायालयाकडे गेले होते. त्यावेळी न्यायालयाने काम थांबवण्यास सांगितले होते. परंतु मागच्या वर्षी पुन्हा न्यायानालाने हे काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यांच्या बंगल्याचा काही भाग ताब्यात घेऊन तेथील प्रक्रिया एका महिन्यात सुरू होईल, असे महानगर पालिकेने सांगितले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा