Sunday, May 12, 2024

आनंदाची बातमी! दिया मिर्झा- वैभव रेखीला पुत्ररत्न प्राप्त; लग्नाच्या ६ महिन्यानंतर अभिनेत्री बनली आई

सिनेसृष्टीतून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अभिनेत्री दिया मिर्झा आणि तिचा पती वैभव रेखी यांनी आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. या जोडप्याला पुत्ररत्न प्राप्त झाला आहे. अभिनेत्रीने तिच्या ट्विटरवर बाळाच्या हाताच्या एक फोटो शेअर करत, चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. तसेच तिने बाळाचे नाव देखील उघड केले आहे. त्यांनी त्यांच्या बाळाचे नाव अव्यान आझाद रेखी असं ठेवलं आहे.

दिया मिर्झा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती सतत तिच्या चाहत्यांसोबत काही ना काही शेअर करत असते. दिया बर्‍याच दिवसांपासून तिच्या प्रेग्नन्सीबद्दल चर्चेत होती. आता तिने दोन महिन्यांपूर्वीच आई बनल्याची माहिती दिली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, तिने १४ मेला एका मुलाला जन्म दिला आहे. (dia mirza and vaibhav rekhi welcome baby boy name him avyaan see photo)

दिया आणि वैभव रेखी यांचे १५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मित्र आणि कुटूंबाच्या उपस्थितीत लग्न झाले होते. त्यांचे लग्न एक खासगी आणि साध्या पद्धतीने पूर्ण झाले. तसेच, दियाच्या लग्नात महिला पंडित चर्चेचा विषय बनली होती. तिने एक पोस्ट शेअर करून सांगितले होते की, तिचे लग्न एका पंडित महिलेने केले आहे. कन्यादान आणि निरोप विधी तिच्या लग्नात झाले नसल्याचेही तिने सांगितले होते. यामुळे दियाचे लग्न भलतेच चर्चेत आले होते.

दियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती अखेरच्या वेळेस ‘थप्पड’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तापसी पन्नू आणि पावेल गुलाटी मुख्य भूमिकेत होते. दीयानेही या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये तेलगू चित्रपट ‘वाईल्ड डॉग’चा समावेश आहे. यात दीया प्रिया वर्माच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा