फैजल खान (Faisal Khan) हे डान्सिंग क्षेत्रातील प्रत्येकासाठीच परिचित असलेले नाव आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून येऊन फैजलने एक यशस्वी वाटचाल केली आहे. तो सोशल मीडियावरही सतत सक्रिय असतो आणि आपल्या डान्सचे नवनवे व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. सिनेसृष्टीतील कलाकारांसोबतही त्याचे अनेक डान्स व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात. फैजलचे वडिल एक रिक्षा ड्रायव्हर होते. आपल्या गरीब परिस्थितीवर मात करत फैजलने यशाचे शिखर गाठले आहे. रविवारी (३० जानेवारी) फैजल त्याचा २३वा वाढदिवस साजरा करत आहे.
फैजल खान सध्या अभिनेता म्हणून काम करत असला, तरी तो एक यशस्वी डान्सर आहे. त्याने ‘डान्स इंडिया डान्स पर्व २’च्या विजेतेपदाचा मान पटकावला आहे. आपल्या मेहनतीने त्याने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. फैजलने ‘नच बलिए’ या कार्यक्रमातही आपला सहभाग नोंदवला होता. मात्र दुखापतीमुळे त्याला या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले .फक्त डान्सच नव्हे, तर त्याने अभिनय क्षेत्रातही आपली जोरदार छाप पाडली आहे. त्याने ‘चंद्रगुप्त मौर्या’, ‘महाराणा प्रताप’ सारख्या लोकप्रिय मालिकेत अभिनय केला आहे. सध्या यशाच्या शिखरावर असलेल्या फैजलची घरची परिस्थिती एकेकाळी खुपच नाजूक होती.
एका कार्यक्रमात फैजलने सांगितले होते की, तो एका सामान्य कुटूंबातून आला आहे. त्याचे वडिल एक रिक्षा चालक आहेत. मात्र आज फैजलने आपल्या जिद्दीच्या जोरावर अनेक महागड्या गाड्या घेतल्या आहेत. फैजल ज्यावेळी ‘डान्स इंडिया डान्स’मध्ये सहभागी झाला होता, त्यावेळी त्याच्या मेहनतीचं आणि यशाचं सर्व परिक्षक कौतुक करताना दिसत होते. आपल्या वडिलांना आता रिक्षा चालवावी लागत नसली, तरी ते आजही रिक्षाने प्रवास करतात असेही फैजलने सांगितले होते. आपल्या कष्टाने फैजलने मुंबईमध्ये घरही घेतले आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे आलीशान गाड्यासुध्दा आहेत.
आत्तापर्यंत फैजलने अनेक मोठमोठ्या डान्सच्या स्पर्धेत तसेच कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. ज्यामध्ये ‘डांस के सुपरकिड्स’,’ इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’, ‘डांस का टशन’, ‘चंद्रगुप्त मौर्य’, ‘खतरों के खिलाड़ी’ ‘नच बलिए’ या कार्यक्रमांचा समावेश आहे.
हेही वाचा :