Thursday, July 18, 2024

अभिनेता नाही तर दिग्दर्शक, रितेश देशमुखचा नवीन चित्रपट वेड लवकरच…

इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध जोडप्यांपैकी जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची जोडी ओळखली जाते. आपल्या रोमांटिक अंदाजाने सतत ही जोडी चाहत्यांवर भुरळ घालत असते. या जोडप्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत असतात. दोघेही आपल्या वैयक्तीक आयुष्यामध्ये खूपच खुश असतात. रितेश आता पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना भेटायला येत आहे मात्र, यावेळेस तो अभिनेता नसून दिगदर्शकाच्या भूमिकेत चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे.

प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) याने 20 वर्ष अभिनय कारकिर्द गाजवल्यानंतर रितेश देशमुख आता आगळ्यावेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. रितेश आपल्या चाहत्यांसाठी एक नवीन चित्रपट ‘वेड’ घेऊन येत आहे. या चित्रपटाचे कथा कथन आणि दिग्दर्शन स्वत: रितेश देशमुख करणार आहे. त्यासोबतच या चित्रपटामधून अभिनेत्री जेनेलिया देशमुख ( Genelia Deshmukh) मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्ण करणार आहे. यापूर्वी अभिनेत्रीने तेलगू, कन्नड आणि मल्याळम अशा 5 भाषांमध्ये आपली छाप सोडली आहे. आता ती मराठी चित्रपटांमध्ये काम करण्यास सज्ज झाली आहे

‘वेड’ या चित्रपटामधून जेलेलिया मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथा कथन रितेश कणार आहे. यामध्ये अभिनेत्री जिया शंकर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आघाडीचे सांगितकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटाची गाणी संगीबद्ध केली आहेत. आज या चिक्षपटाच्या प्रदरेशनाची घोषणा मुंबई फिल्म कंपनीने सोशल मीडियावर केली आहे.रितेश द्वारा दिग्दर्शित वेड हा चित्रपट (दि. 30 ऑक्टोंबर) दिवशी प्रदर्शित होणारल आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी आणि खुशी कपूर होत्या एकाच व्यक्तिच्या प्रेमात वेड्या? जाणून घ्या काय आहे ‘मोठ्या बहिणी’चे उत्तर
‘या चित्रपटामध्ये माझ्या ह्रदयाचा एक भाग आहे,’ म्हणत करण जोहरने ये दिल है मुश्किलला 6 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल शेअर केली पोस्ट

हे देखील वाचा