‘माझा अभ्यास करू नका, तुम्ही पदवीधर होणार नाही’, पाहा जेनेलिया देशमुखची दिलखेचक अदा


काही अभिनेत्रींची लोकप्रियता ही त्यांच्या चित्रपटापेक्षा त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून पाहायला मिळते. खरं तर सोशल मीडियाला लोकप्रियतेचे व्यासपीठ म्हणण्यास काही वावगे ठरणार नाही. कारण काही कलाकारांची लोकप्रियता सोशल मीडियावर जास्त असते. याच कलाकारांपैकी एक नाव म्हणजे जेनेलिया देशमुख. पाहायला गेलं तर लग्नानंतर जेनेलिया चित्रपटसृष्टीपासून जवळ जवळ लांबच गेली आहे. तरी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी आजही जोडून आहे. पती रितेश देशमुखसोबत तिचे अनेक रोमँटिक तसेच मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच तिचा आणखी एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

जेनेलियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने एक बॅकलेस ड्रेस घातला आहे. तसेच या फोटोमध्ये तिची वेड लावणारी स्माईल दिसत आहे. ती खूपच बोल्ड दिसत आहे. (Jenelia deshmukh share her bold photo on social media with intresting caption)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “माझा अभ्यास करू नका, त्याने तुम्ही पदवीधर होणार नाही.” तिचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. तिचे चाहते सातत्याने या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. तसेच तिचे कौतुक करत आहेत.

जेनेलिया आणि रितेश देशमुखला दोन मुलं आहेत. असे असले तरीही आजही जेनेलिया तेवढीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिच्याकडे बघून कोणीही अंदाज लावू शकत नाही की, ती दोन मुलांची आई आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुखमधील प्रेमाचे दर्शन आपल्याला वेळोवेळी त्यांच्या सोशल मीडिया व्हिडिओवरून होत असते.

जेनेलियाने 2003 साली ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. तिने तमिळ चित्रपट ‘बॉईज’ मध्ये देखील याच वर्षी काम केले होते. तसेच तिने ‘मस्ती’, ‘जाने तू या जाने ना’, ‘तेरे नाल लव्ह हो गया’, ‘हॅपी’, ‘फोर्स’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्विमिंग पूलच्या कडेला मोनालिसाने दिल्या घायाळ करणाऱ्या पोझ; पाहून वाढतील तुमच्याही हृदयाचे ठोके

-शुभमंगल सावधान!!! राहुल वैद्य आणि दिशा परमार अडकले विवाहबंधनात; लग्नसोहळ्याचे खास फोटो आले समोर

-आदिल खानसोबत जोरदार ठुमके लावताना दिसली शिल्पा शेट्टी; ‘चुरा के दिल मेरा’ गाण्यावरचा धमाल परफोर्मेंस होतोय व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.