Monday, July 15, 2024

‘या चित्रपटामध्ये माझ्या ह्रदयाचा एक भाग आहे,’ म्हणत करण जोहरने ये दिल है मुश्किलला 6 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल शेअर केली पोस्ट

बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शर्मा यांचा रोमांटिक चित्रपट ‘ऐ दिल है मुश्किल’ याला प्रदर्शित होऊन आज (दि. 28 ऑक्टोंबर) दिवशी सहा वर्ष पूर्ण होत आहेत. हा चित्रपट खूपच गाजला होता. यामधली गाण्यांनी तर सगळ्यांना वेडच लावले होते . हा चित्रपट करण जोहर याचा खुप जवळचा आहे. त्यामुळे त्याने आपल्या सोशल मीडियावर लक्ष वेधनारी पोस्ट शेअर केली आहे.

‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटामध्ये एकत्र तिन स्टार होते त्यामुळे हा चित्रपट खूपच गाजला होता. यामध्ये मोट्या ब्रेक नंतर पहिल्यांदाच एश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिने काम केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथा करण जोहर (Karan Johar) याने केले आहे. त्यामुळे करण जेहरचा हा चित्रपट खूपच जवळचा आहे. त्याने चित्रपटाला सहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवरुन चित्रपटातील एक शॉर्ट सिन शेअर केला असून लक्षवेधनारे कॅप्शनदेखिल लिहिले आहे.

करण जोहरने आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवरुन ऐ दिल है मुश्किल चित्रपटाचा एक सिन व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor) बोलत आहे की, ‘आसान है क्या ऐसी मोहब्बत करना जिसके बदले मोहब्बत न मिले’| त्याशिवाय या व्हिडिओमध्ये ‘चन्ना मेरे आ’ हे गाणं देखिल वाजतं

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

करण जोहरने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “या चित्रपटामध्ये माझ्या ह्रदयाचा एक भाग आहे. जो प्रेम, मैत्री आणि अर्थातच भावनांचा संपूर्ण स्तराचा शोध लावत असतो. एकतर्फी प्रेम! कलाकार, टीम, संगीत- सर्वकाही जे प्रेक्षकांच्या मनात गुंजले ते थेट सर्वांच्या हृदयात गेले.६ वर्षांनंतरही ती अनेकांशी बोलत असल्याचे दिसते आणि त्यासाठी मी सदैव ऋणी आहे.”

करण जोहरने व्हिडिओसोबत चित्रपटाविषयी आपल्या मनातील असलेली भावना व्यक्त केली आहे. यावरुन समजते की, करण जोहरचा हा चित्रपट किती जवळ आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
बिग बॉसचं घर बनलं रोमांटिक हॉस्टेल, अब्दु-निमरित पासून ते साजिद-अर्चनानेही लुटला आनंद
‘बॅन करुन, कोठडीत टाका अशा’…; पाकिस्तानी अभिनेता फिरोज खानवर भडकली इंडस्ट्री

 

 

हे देखील वाचा