Tuesday, June 25, 2024

नेहा धुपियाने शेअर केला बापलेकाचा सुंदर फोटो, अंगदच्या चेहऱ्यावर दिसले समाधान

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया केवळ तिच्या इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट पात्रांसाठीच नव्हे, तर तिच्या उत्साहासाठी देखील ओळखली जाते. तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही प्रसिद्धीच्या झोतात राहिली आहे. नेहाने यावर्षी ऑक्टोबरमध्ये तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. तिचा पती अभिनेता अंगद बेदीने ही माहिती सर्वांना दिली होती. अंगदने हा आनंद चाहत्यांसोबत शेअर करत त्यांना दुसरा मुलगा झाल्याचे सांगितले. एक योद्धा असल्याबद्दल त्याने नेहाचे कौतुक करत आभार मानले. प्रत्येक वळणावर अंगद नेहासोबत कसा होता हे दाखवणारे अनेक फोटो आणि व्हिडिओ या जोडप्याने पोस्ट केले आहे. अगदी डिलिव्हरीला ऑपरेशन रूममध्ये जाताना देखील अंगद तिच्यासोबत होता. नेहाच्या बाळाला बघण्यासाठी तिचे फॅन्स खूपच उत्सुक झाले होते. मात्र नेहाने आता ही उत्सुकता संपवली असून, तिने तिच्या बाळाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

नेहाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये अंगद बाळाला बाटलीने दूध पाजताना दिसत आहे. मात्र या फोटोमध्ये बाळाचा चेहरा दिसत नाहीये. परंतु अंगदच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना नेहाने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “प्रतीक्षा करू शकत नाही.” यासोबतच तिने #mancrushmonday हा हॅशटॅगही दिला आहे. फोटोमध्ये अंगद लिविंग रूममध्ये त्याच्या दीड महिन्याच्या बाळाला हातावर घेऊन बसून दूध पाजत आहे.

तो आपल्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहून हसत आहे. या फोटोला २७ हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक केले असून, त्यावर सातत्याने कमेंट येत आहेत. या फोटोवर सबा अली खाननेही लाईक केले आहे. या फोटोवर नेहाचे चाहते हार्ट इमोजी बनवून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

नेहा धुपियाने अभिनेता अंगद बेदीशी १० मे २०१८ रोजी गुपचूप लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. नेहाच्या लग्नाच्या फोटोंनी तिला आणि अंगदच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. यानंतर, नेहाने नोव्हेंबर २०१८ मध्ये तिच्या पहिली मुलगी मेहरला जन्म दिला. आता हे जोडपे त्यांच्या दुसऱ्या मुलाचा आनंद साजरा करत आहे. न्हा लग्नाआधीच प्रेग्नेंट झाल्याने त्यांना पटकन लग्न करावे लागले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा