Monday, June 24, 2024

टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

व्हीजे बानी ही चित्रपट आणि टेलिव्हजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे, जी तिच्या ऑफबीट फॅशन सेन्स आणि स्टाइलमुळे तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ‘रोडीज’ या शोची होस्ट म्हणून तरुण मंडळी तिला ओळखतात. अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये दिसलेल्या व्हीजे बानी हिचा सोमवारी (२९ नोव्हेंबर) वाढदिवस आहे. आज ती ३४ वर्षांची झाली आहे. तर चला, बानीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टींबद्दल.

व्हीजे बानीचे खरे नाव गुरबानी जज आहे. तिचा जन्म २९ नोव्हेंबर १९८७ रोजी चंदीगडमध्ये झाला होता. बानीचे वडील बिझनेस करतात, तर आई गृहिणी आहे. साध्या कुटुंबात जन्मलेल्या बानीने नेहमीच उंच स्वप्ने पाहिली आहेत. यामुळेच आज ती हजारो तरुणांसाठी आदर्श आहे. (birthday special vj bani is fond of tattoos has hosted many seasons of roadies)

टॅटूचा आहे छंद
माध्यमातील वृत्तानुसार, व्हीजे बानीने ग्राफिक डिझायनिंगचा अभ्यास केला आहे, जो तिच्या व्यक्तिमत्त्व आणि सोशल मीडिया प्रोफाइलवरून देखील स्पष्ट होतो. तिने तिच्या शरीरावर खूप सुंदर टॅटू देखील बनवले आहेत, ज्यामुळे ती सहजपणे लोकांचे लक्ष वेधून घेते.

‘रोडीज’चे बरेच सीझन केले आहेत होस्ट
बानीने २००६ मध्ये टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता. वेळेनुसार, तिच्यामध्येही प्रचंड बदल होत गेले. ‘रोडीज’च्या सीझन ४ मध्ये ती दिसली होती. यानंतर तिने एमटीव्हीसाठी व्हीजे म्हणून काम केले. माध्यमातील वृत्तानुसार, तिने २००८-२००९ मध्ये पहिल्यांदा ‘रोडीज’ शो होस्ट केला होता. यानंतर तिने ‘रोडीज’चा ७वा, ८वा, ९वा, १०वा आणि १२वा सीझन होस्ट केला.

टीव्ही शो आणि चित्रपटातही केलंय काम
लोकप्रिय ‘बिग बॉस १०’ आणि ‘खतरों के खिलाडी’ सारख्या शोमध्ये प्रेक्षकांनी तिला चांगलेच पसंत केले. तिने ‘क्या मस्त है लाइफ’ या टेलिव्हिजन शोमध्येही काम केले आहे. बानी टेलिव्हिजन शोशिवाय चित्रपटांमध्येही दिसली आहे. तिने २००७ मध्ये आलेल्या ‘आप का सुरूर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०११ मध्ये आलेल्या ‘साउंडट्रॅक’ या चित्रपटात ती पुन्हा दिसली होती, ज्यामध्ये तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. तिने तेलुगू सिनेमातही काम केले आहे. अलीकडेच बानी ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा