बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदी दुसऱ्यांदा आई- वडील बनणार आहेत. नेहाने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. अशातच आता अंगद बेदीने नेहाच्या प्रेग्नंसीबाबत सांगितले आहे. ज्यामुळे हे जोडपे चर्चेत आहे.
अंगदने सांगितले की, नेहाची दुसरी प्रेग्नंसी खूपच आव्हानात्मक होती. कारण ती ३ वर्षांनंतर यातून जात होती. (Actor Angad Bedi Shares Challenges of Neha Dhupia Second Pregnancy)
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अंगदने म्हटले की, “हा एक वेगळा अनुभव आहे. हे नेहासाठी सोपे नाहीये. मात्र, ती आपले धैर्यावर कायम आहे. ती काम करत आहे आणि वेळही लक्षात घेत आपले सर्व प्रोजेक्ट्स पूर्ण करत आहे. आम्ही कुटुंबात एका सदस्याला आणण्यासाठी आनंदी आहोत. माझ्यासाठी नेहाचे आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे.”
अंगदने म्हटले की, दोघांनीही दुसऱ्या मुलाबाबत चर्चा केली होती. मात्र, त्यांनी दुसऱ्या प्रेग्नंसीची योजना केली नव्हती. अंगद म्हणतो, “आम्ही मेहरच्या भाऊ- बहिणीबाबत चर्चा केली होती. मात्र, आम्हाला माहिती नव्हते की, हे इतके लवकर होईल. आम्ही आभारी आहोत की, हे योग्य वेळेवर झाले आहे.”
यापूर्वी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना नेहाने सांगितले होते की, ती त्यावेळी प्रेग्नंट झाली होती, जेव्हा अंगदला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. ती म्हणाली होती, “त्यावेळी आम्ही खूप संकटातून गेलो. जेव्हा तुमच्या आजूबाजूला कोरोना असतो आणि त्यावरून तुम्ही प्रेग्नंट असता, तेव्हा ते कठीण असते. मात्र, त्यावेळी अंगदच होता, ज्याने मला सकारात्मक राहण्यासाठी मदत केली.”
नेहाने सोशल मीडियावर आपल्या दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा करताना कुटुंबाचा एक फोटो शेअर केला होता. त्यात तिच्यासोबत त्यांची छोटी मुलगी मेहर आणि पती अंगद बेदी दिसत होता. तिघांनीही काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. नेहाने फोटोला कॅप्शन देत सांगितले होते की, तिला आपल्या प्रेग्नंसीच्या घोषणेसाठी कॅप्शन शोधण्यातही वेळ लागेल. तिने लिहिले होते की, “आम्हाला एक कॅप्शन शोधण्यासाठी दोन दिवस लागले. यामध्ये आम्ही सर्वात चांगला विचार करू शकत होतो, ते होते… धन्यवाद देवा.”
नेहाने सन २००३ मध्ये आलेल्या ‘कयामत: सिटी अंडर थ्रेट’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ती शेवटची सन २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हेलिकॉप्टर इला’मध्ये झळकली होती. यामध्ये काजोलचाही समावेश होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता! शाहरुख खानने मध्येच थांबवली त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची शूटिंग; सलमान खान आहे कारण?