काय सांगता! शाहरुख खानने मध्येच थांबवली त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची शूटिंग; सलमान खान आहे कारण?


बॉलिवूडमध्ये ज्या ‘खान’ मंडळींची चर्चा नेहमी सुरू असते ते म्हणजे सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान होय. यापैकी सलमान आणि शाहरुख हे दोघेही त्यांच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये सध्या व्यस्त आहेत. सलमान खानने काही दिवसांपूर्वी त्याच्या ‘टायगर 3’ या चित्रपटाची शूटिंग सुरू केली होती. तो शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. परंतु शाहरुख खानने सलमान खानमुळे त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटाची शूटिंग थांबवली आहे. शाहरुख खान देखील सलमान खानच्या ‘टायगर 3’ मध्ये एका जबरदस्त पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, सलमान खान कॅटरिना कैफसोबत पुढच्या वीकेंडला ‘टायगर 3’ची शूटिंग सुरू करणार आहे, तर दुसरीकडे शाहरुख खान देखील त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्या दोघांची शूटिंग एकमेकांच्या जवळपास होत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान पुढच्या आठवड्यात सलमानच्या चित्रपटात कॅमियोची शूटिंग करू शकतो. तो त्याची शूटिंग सोडून कॅमियोची शूटिंग करणार आहे. इमरान हाश्मी देखील लवकरच या चित्रपटात झळकणार आहे. (Shahrukh Khan left the shooting of the film pathan in the middle salman Khan become the reason)

माध्यमातील वृत्तानुसार, मनीष शर्मा चित्रपटासाठी खास सेट तयार करत आहेत. शाहरुख खान रॉ-एजेंट या दमदार पात्रात दिसणार आहे. चाहते देखील त्यांच्या आवडत्या कलाकाराच्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत असतात. सलमान खानने या आधी देखील ‘पठाण’ चित्रपटात कॅमियोची शूटिंग केली आहे.

सध्या सलमान खान आणि सोमी अली हे त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. सोमी अलीने तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, तिचा आणि सलमान खानचा गेल्या पाच वर्षात काहीच संपर्क झाला नाही. हे ऐकून सगळेच खूप हैराण झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इतके पैसे कसे कमवता?’, कपिल शर्माने विचारलेल्या प्रश्नावर राज कुंद्राने दिली होती ‘अशी’ रिऍक्शन

-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या


Leave A Reply

Your email address will not be published.