भोजपुरी अभिनेत्री नीलम गिरीने बाथरूममध्ये केला आमिर खानच्या गाण्यावर डान्स; शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय सुंदर


सोशल मीडिया आणि कलाकार यांचे खूपच जवळचे नाते आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहून कलाकार नेहमी प्रकाशझोतात राहतात. या सोशल मीडियावर सतत सक्रिय राहण्यासाठी कलाकार त्यांचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करतच असतात. सोबतच ते सोशल मीडियावरील नवनवीन ट्रेंड्स फॉलो करून देखील सोशल मीडियावर सक्रिय दिसतात. सध्या इंस्टाग्रामवर रील्स खूपच ट्रेण्डिंगमध्ये आहे. हे रील्स तयार करण्यामध्ये सामान्य लोकांसोबतच कलाकार देखील पुढे आहेत.

या कलाकारांमध्ये हिंदीसोबतच भोजपुरी भाषेतील कलाकार देखील हे रील्स बनवून लाईमलाईट्मधे येत आहेत. नुकतेच भोजपुरीमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या नीलम गिरीने नुकतेच तिचे एक रील इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहे. या रीलमध्ये नीलम बाथरूममध्ये डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्या सुपरहिट ‘राजा हिंदुस्थानी’ चित्रपटातील ‘तेरे इश्क में नाचेंगे’या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना आहे. शॉर्ट ड्रेसमध्ये दिसणाऱ्या नीलमच्या सौंदर्यात तिचे मोकळे केस अधिक भर घालत आहेत.

या व्हिडिओला अधिक आकर्षक आणि लक्षवेधी बनवत आहे याचे एडिटिंग. नीलमने या व्हिडिओला रंगीत इफेक्ट दिला आहे. हा व्हिडिओ तिच्या फॅन्समध्ये आणि सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, तिच्या या व्हिडिओवर फॅन्सच्या विविध कमेंट्स देखील येत आहेत.

रील तयार करण्याची नीलमची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील तिने तिचे भन्नाट रील्स सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. नीलम भोजपुरीमधील आघाडीची अभिनेत्री असून, ती नेहमी सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. ती तिच्या अभिनयसोबतच तिच्या बोल्ड आणि मादक अवतारासाठी देखील ओळखली जाते. सोशल मीडियावरही तिला लाखो फॉलोवर्स आहेत.

नुकतेच नीलम गिरीचे ‘गरईया मछरी’ हे शिल्पी राजच्या आवाजातील गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात निलमसोबतच पल्लवी गिरी देखील आहे. या गाण्यात या दोघींच्या डान्सने धमाका केला आहे. या गाण्यातला या दोघींचा पारंपरिक लूक देखील गाजत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट’ म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या आदित्यला सीआयडीच्या ‘अभिजीत’ने मिळवून दिली घराघरात ओळख

-तुझी- माझी जोडी लाखात एक! सुपरस्टार राम चरणकडून पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; पत्नीचा आला ‘असा’ रिप्लाय

-काय सांगता! शाहरुख खानने मध्येच थांबवली त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची शूटिंग; सलमान खान आहे कारण?


Leave A Reply

Your email address will not be published.