Friday, March 29, 2024

अनिल कपूर यांना आवडली नव्हती ‘जुदाई’ची स्क्रिप्ट, 25 वर्षांनंतर सांगितले चित्रपट करण्याचे कारण

बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर, अभिनेत्री श्रीदेवी आणि उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) १९९७ मध्ये आलेल्या ‘जुदाई’ चित्रपटात मुख्य कलाकार होते. प्रदर्शित होताच हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला होता. चित्रपटाची कथा खूप वेगळी होती. चित्रपटात पैशाच्या लोभापायी श्रीदेवी (Sridevi) तिच्याच नवऱ्याचे दुसऱ्या स्त्रीशी (उर्मिला मातोंडकर) लग्न लावून देते. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, याआधी अनिल कपूर यांना हा चित्रपट करायचा नव्हता.

हा चित्रपट नव्हता करायचा 

अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी माध्यमांशी केलेल्या संभाषणात सांगितले की, “मी चित्रपटाला नाही म्हणत राहिलो कारण मी पात्राशी जोडू शकलो नाही. हा चित्रपट करण्यासाठी माझ्यावर कुटुंब आणि कौटुंबिक निर्मिती कंपनीकडून खूप दबाव होता. कारण ‘रूप की रानी चोरों का राजा’ हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आम्ही आर्थिकदृष्ट्या वाईट टप्प्यातून जात होतो.”

चित्रपट करण्यामागचे कारण स्पष्ट करताना अनिल कपूर यांनी खुलासा केला की, शेवटी अँडी गार्सिया आणि मेग रायन स्टारर ‘व्हेन अ मॅन लव्हज अ वुमन’ पाहिल्यानंतर ते चित्रपट करण्यास तयार झाले. मग नंतर या चित्रपटात काम केले. जो चांगलाच पसंत केला गेला.

अनिल कपूर सध्या आहेत खूश 

अनिल कपूर म्हणाले की, “मी हा चित्रपट केला याचा मला आनंद आहे. सुरुवातीला हा चित्रपट मी कुटुंबासाठी केला होता. श्रीदेवी आणि उर्मिला मातोंडकर सारख्या प्रतिभावान अभिनेत्रींसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. तेव्हा कामाची शैली खूप वेगळी असायची आणि त्यातही एक वेगळंच आकर्षण असायचं. आता चित्रपट प्रदर्शित होऊन 25 वर्षे झाली आहेत.

विविध प्रकारचे चित्रपट

यावर अनिल कपूर म्हणाले की, ‘परिंदा’, ‘ईश्वर’, 1942: अ लव्ह स्टोरी’, ‘मिस्टर इंडिया’, ‘विरासत’, ‘पुकार’, ‘एके वर्सेज एके’ आणि ‘अब थार’, मी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट करण्याचा प्रयत्न करतो आणि माझा विश्वास आहे की, हे देखील एक कारण आहे ज्यामुळे मी दीर्घकाळ चित्रपटसृष्टीत टिकू शकलो.”

अनिल कपूर गेल्या चार दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. 65 वर्षीय अनिल कपूर त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात आणि आजही ते वर्षातून अनेक चित्रपट करतात. अनिल कपूर यांची फॅन फॉलोविंग देखील खूप मोठी आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
इकडं अनिल कपूरने व्हील चेअरवर नाही बसायचं ठरवलं, तिकडं श्रीदेवीचा हिरो बनत ऋषी कपूरांनी लुटली मैफील
जेव्हा माधुरीला विचारले गेले अनिल कपूरशी लग्न करणार का?, त्यावर अशी होती धक धक गर्लची प्रतिक्रिया

हे देखील वाचा