धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) भारतीय सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सहजसुंजर अभिनयाने आणि मनमोहक सौदर्याने माधुरीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. माधुरीच्या अभिनयाचे आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याचे असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतात. ९० च्या दशकात तिच्या चित्रपटांनी तरुणाईला वेड लावले होते. मात्र लाखो तरुणाईच्या ह्रदयावर राज्य करणाऱ्या माधुरीने अभिनेता अनिल कपूरसोबत लग्न करणार असल्याच्या बातमीवर जोरदार प्रतिक्रिया दिली होती. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.
माधुरी दीक्षित ही ९० च्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. आजही माधुरी बद्दलचे अनेक किस्से तिच्या चाहत्यांना ऐकायला आवडतात. सोशल मीडियावर आजही माधुरीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये तिच्या मनमोहक अदांची झलक पाहायला मिळते. माधुरी दीक्षितने ९० च्या काळातील शाहरुख खान, अनिल कपूर, सलमान खान इत्यादी सर्व मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. मात्र, एकेकाळी अभिनेता अनिल कपूरसोबतची माधुरीची जोडी सर्वाधिक आवडली होती.
माधुरीने अनिल कपूरसोबत राम लखन, टोटल धमाल, कर्मा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या काळात माधुरीला अनिल कपूर यांच्यासोबत लग्न करणार का असे प्रश्न अनेक मुलाखतीत विचारले जायचे. ज्यावर तिने प्रतिक्रिया दिली होती. माधुरीने अभिनेता अनिल कपूरशी संबंधित प्रश्नांनाही मजेशीर उत्तरे दिली.
मुलाखतीदरम्यान माधुरीला विचारण्यात आले की, तिला अनिल कपूरसोबत लग्न करायचे आहे का? यावेळी माधुरी म्हणाली की, “नाही, मी त्याच्यासारख्या कोणाशी लग्न करणार नाही, तो खूप अतिसंवेदनशील आहे, मला माझा नवरा मस्त स्वभावाचा असावा असे वाटते.” याबद्दल पुढे बोलताना माझुरी म्हाली माधुरी पुढे म्हणते, “मी अनिलसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मी त्याच्यासोबत काम करण्यास नेहमीच तयार असते”. माधुरी दीक्षितने 17 ऑक्टोबर 1999 रोजी व्यवसायाने डॉक्टर श्री राम नेनेशी लग्न केले होते. जर आपण वर्क फ्रंटबद्दल बोललो तर, नुकतेच माधुरी दीक्षितने द फेम गेमद्वारे डिजिटल पदार्पण केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- काय सांगता! भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग घेणार दुसऱ्या बायकोपासून घटस्फोट?
- या अभिनेत्याचे रेखाने केले तोंड भरून कौतुक म्हणाली, ‘त्याचे काम पाहण्यासाठी मी जिवंत आहे’
- ऍनिव्हर्सरी नाहीतर बिपाशा आणि करणने केली मंकीवर्सरी साजरी, रोमँटिक फोटो केले शेअर