Friday, October 31, 2025
Home बॉलीवूड अनिल कपूर मुलींच्या लग्नानंतर पडलेत एकटे; सोनम अन् रियाच्या आठवणीत शेअर केली भावुक पोस्ट

अनिल कपूर मुलींच्या लग्नानंतर पडलेत एकटे; सोनम अन् रियाच्या आठवणीत शेअर केली भावुक पोस्ट

आई एवढी माया कोणीही करू शकत नाही, असे म्हटले जाते. मात्र, एका मुलीवर तिचे वडील किती प्रेम करतात, हे मुलगी माहेरी गेल्यानंतरच समजते. असाच एकटेपणा सध्या बॉलिवूड सुपरस्टार अनिल कपूर यांना वाटत आहे. त्यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. त्यांची पोस्ट पाहून तुम्हीही भावुक झाल्याशिवाय राहणार नाहीत.

अनिल कपूर यांनी दिवाळीनिमित्त ग्रँड पार्टी ठेवली होती. तिथे अर्जुन कपूर, बोनी कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्याव्यतिरिक्त अनेक कलाकार आले होते. मात्र, अनिल कपूर यांना या संपूर्ण सेलिब्रेशनदरम्यान आपल्या दोन्ही मुलींची खूपच आठवण येत होती. जिथे सोनम आपला पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये आहे, तर दुसरी मुलगी रिया कपूरही आपला पती करण बूलानीसोबत घरापासून दूर आहे. अशातच आपल्या मुलींची आठवण आल्याने अनिल कपूर यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवर एक भावुक पोस्ट केली आहे. (Actor Anil Kapoor Missing His Daughters Sonam And Rhea This Festive Season)

अनिल कपूर यांनी इंस्टाग्रामवर आपल्या मुलींचे लहानपणीचे ३ फोटो शेअर केले आहेत. यातील एक फोटो वाढदिवसाच्या पार्टीचा आहे. या फोटोत सोनम आणि रिया त्यांच्या मित्रांसोबत दिसत आहेत. सोनम आपली बहीण रियाला केक चारताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोतही दोघी बहिणी दिसत आहेत. तसेच, तिसऱ्या फोटोत सोनम आणि रिया आपले वडील अनिल कपूर यांच्यासोबत दिसत आहेत. या फोटोत सोनम आणि रिया एकदम रॉयल लूकमध्ये नववधूप्रमाणे बसल्या आहेत, तर वडील अनिल कपूर सूट घालून पोझ देत आहेत.

या फोटोंसोबत अनिल कपूर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला तुम्हा दोघांची रोज आठवण येते, पण आज कदाचित जास्तच आठवण येत आहे.”

सध्या वडील म्हणून अनिल कपूर यांचा एकटेपणा खूप भावुक करणारा आहे. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस पाडला जात आहे. अनेक चाहते कमेंट करत आहेत. या पोस्टला आतापर्यंत ८० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो कमेंट्सही मिळाल्या आहेत.

सोनमने व्यावसायिक आनंद आहुजासोबत सन २०१८ मध्ये लग्न केले होते. दोघेही नेहमीच कामानिमित्त भारतात येत असतात. अनिल कपूर यांची दुसरी मुलगी रिया कपूरने करन बूलानीसोबत सन २०२१मध्ये लग्न केले होते. त्यांच्या लग्नात खूपच कमी लोकांनी हजेरी लावली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेता वरुण धवनची भाची अंजिनीच्या ग्लॅमरस फोटोंचा सोशल मीडियावर राडा, हॉट ड्रेसमध्ये दिल्या हटके पोझ

-‘जय भीम’ चित्रपटातील ‘त्या’ सीनवर प्रकाश राज यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘लोकांना आदिवासींचे हाल दिसले नाहीत’

-कपूर बहिणी झाल्या ट्रोल! जान्हवी अन् खुशीने दिलेली पोझ पाहून, नेटकरी विचारतायेत ‘असे’ प्रश्न

हे देखील वाचा