Sunday, March 22, 2026
Home बॉलीवूड ऍपल स्टोअरमध्ये भारतीय घड्याळ नसल्याने अनुपम खेर झाले निराश, ट्वीटद्वारे केली नाराजी व्यक्त

ऍपल स्टोअरमध्ये भारतीय घड्याळ नसल्याने अनुपम खेर झाले निराश, ट्वीटद्वारे केली नाराजी व्यक्त

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय कलाकारांपैकी एक आहेत. ते प्रत्येक विषयावर आपले विचार खुलेपणाने मांडतात. या सक्रियतेमुळे कधीकधी त्यांना ट्रोलिंगला बळी पडावे लागते, पण तरीही ते आपले विचार व्यक्त करण्यास मागे हटत नाहीत. अशात त्यांनी अलीकडेच ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.

अनुपम खेर यांनी ट्वीटद्वारे ऍपल कंपनीमुळे झालेल्या निराशेचा उल्लेख केला. अनुपम मंगळवारी (१४ सप्टेंबर) न्यूयॉर्कमधील ऍपल स्टोअरमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संग्रहातील विविध देशांच्या ध्वजांसह घड्याळे पाहिली. मात्र, या संग्रहात भारतीय घड्याळ नसल्याने ऍपल कंपनीला टॅग करून त्यांनी आपली निराशा व्यक्त केली.

अनुपम खेर यांनी केला संताप व्यक्त
अनुपम यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “प्रिय ऍपल, न्यूयॉर्कमधील ५ व्या अव्हेन्यूवर तुमच्या स्टोअरला भेट दिली. यावेळी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संकलनामध्ये विविध देशांच्या ध्वजांसह घड्याळे होती, पण भारताचे घड्याळ तिथे नसल्याने मी निराश झालो. मला आश्चर्य वाटते की, हे का घडले? आम्ही ऍपल उत्पादनांचे सर्वात मोठे ग्राहक आहोत.”

ट्वीटसह व्हिडिओ केला शेअर
आपल्या ट्वीटसह अभिनेत्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. फ्रान्स, कॅनडा, जमैकासारख्या अनेक देशांची घड्याळे व्हिडिओमध्ये दिसत आहेत. या घड्याळांच्या समोरच्या भागावर त्यांच्या देशाची पहिली अक्षरेही लिहिलेली होती. त्याचबरोबर अनुपम खेर यांच्या ट्वीटवर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

अनेक आठवड्यांपासून अमेरिका आहेत अनुपम
वर्कफ्रंटवर बोलायच झाले, तर अनुपम त्यांच्या आगामी ‘शिव शास्त्री बलबोआ’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी अनेक आठवडे अमेरिकेत आहेत. त्यांनी नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. अजयन वेणुगोपालन दिग्दर्शित या चित्रपटात नीना गुप्ता आणि जुगल हंसराज यांच्याही भूमिका आहेत.

प्रियांकाच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचले अनुपम
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला अभिनेता अनुपम खेर प्रियांका चोप्राच्या न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध ‘सोना’ रेस्टॉरंटमध्ये पोहोचले होते. येथे पोहोचल्यानंतर, अभिनेत्याने फक्त जेवणच केले नाही, तर तिथे उपस्थित असलेल्या शेफसोबतच्या फोटोंसाठी पोझही दिली. अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत हे फोटो शेअर करताना अभिनेत्री प्रियांकाचे कौतुकही केले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा भारताबद्दल परदेशी होस्टने ऐश्वर्याला विचारला ‘हा’ प्रश्न; अभिनेत्रीनेही दिले होते सडेतोड प्रत्युत्तर

-‘एकेकाळी टॅक्सीमध्ये बसणे अभिमानाची गोष्ट होती’, अनिल कपूर यांनी ‘त्या’ दिवसांची काढली आठवण

-तब्बल ३० वर्षानंतर अजय देवगणने रिक्रिएट केला त्याचा ‘सिग्नेचर स्टंट’; ट्रकवर केली जबरदस्त ऍक्शन

हे देखील वाचा