Monday, July 1, 2024

अरबाजने अनिल यांना विचारला सलमानच्या लग्नाचा प्रश्न; अभिनेते म्हणाले, ‘तू तर त्याचा भाऊ आहेस…’

सलमान खान त्याची पिळदार शरीरयष्टी, अभिनय आणि लग्न या गोष्टींसाठी नेहमीच चर्चेत असतो. अनेक वर्षांपासून फक्त त्याच्या कुटुंबीयांनाच नाही, तर त्याच्या चाहत्यांना देखील सतावत असलेला प्रश्न म्हणजे, सलमान लग्न कधी करणार? आता हा प्रश्न अरबाजने अनिल कपूर यांना विचारला आहे. अनिल यांनी याचे उत्तर देखील दिले आहे.

ट्रोलर्स आणि नेटकऱ्यांच्या टीकांवर भाष्य करणारा शो म्हणजे ‘पिंच’ होय. सध्या ‘पिंच’चे दुसरे पर्व सुरू आहे. दररोज या शोमध्ये वेगवेगळे आणि नवीन कलाकार सोशल मीडियावरील ट्रोलर्सना उत्तरे देतात. अशात बुधवारी (१५ सप्टेंबर) या शोमध्ये अनिल कपूर आले होते. अरबाज आणि त्यांच्यात खूप गप्पा- गोष्टी झाल्या. अरबाजने त्यांना खूप प्रश्न विचारले. यामध्ये सलमानच्या लग्नापासून ते त्यांच्या अंगावर असलेल्या केसांबद्दल चर्चा झाली. तसेच ट्रोलर्सना देखील अनिल यांनी स्वतःच्या अनोख्या अंदाजात गाणे गात उत्तर दिले. (Actor Arbaaz Khan ask Anil Kapoor about Salman Khan married and his body fitness)

अनिल कपूर यांनी सलमानच्या लग्नाविषयी दिले उत्तर
अरबाजाने अनिल यांना प्रश्न विचारला की, “सलमानचे लग्न कधी होणार?” यावर अनिल कपूर म्हणाले, “तू तर सलमानचा भाऊ आहेस तूच सांग मला, घरी काही बातचीत, तर होतच असेल ना.” यावर अरबाज म्हणाला, “अहो थकून गेलोय आम्ही.” त्यानंतर अनिल कपूर स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाले, “चर्चा तर होते, पण जर तो स्वतःच काही उत्तर नाही देत, तर मी कसं काही बोलू.”

अनिल कपूर अजूनही कसे काय आहेत जवान
यानंतर चांगली वेळ बघत अरबाजने त्यांच्या कमी होत नसलेल्या तारुण्याबद्दल विचारले. यावर उत्तर देत अनिल यांनी बॉलिवूडचे एक गाणे सादर केले, “बहुत दिया देने वाले ने तुझको, आंचल ही ना समाए तो क्या कीजै.” त्यांच्या या उत्तराने सेट वरचा माहोलच बदलला आणि अधिक रंजक झाला.

त्यांनतर अरबाजने अनिल यांना त्यांच्या अंगावर असलेल्या केसांवर खूप मिम्स बनवले जातात असे विचारले. त्यावर त्यांनी हास्यास्पद उत्तर दिले आणि म्हणाले, “आज मी टकलं करून आलोय तुमच्या शोमध्ये. केस एवढे वाढले आहेत, तर आजकाल ट्रांसप्लांट खूप ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे ज्याला कुणाला केस पाहिजे असतील त्यांनी या आणि घेऊन जा.”

अनिल कपूर लवकरच त्यांचा आगामी चित्रपट ‘जुग जुग जियो’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा भारताबद्दल परदेशी होस्टने ऐश्वर्याला विचारला ‘हा’ प्रश्न; अभिनेत्रीनेही दिले होते सडेतोड प्रत्युत्तर

-‘एकेकाळी टॅक्सीमध्ये बसणे अभिमानाची गोष्ट होती’, अनिल कपूर यांनी ‘त्या’ दिवसांची काढली आठवण

-तब्बल ३० वर्षानंतर अजय देवगणने रिक्रिएट केला त्याचा ‘सिग्नेचर स्टंट’; ट्रकवर केली जबरदस्त ऍक्शन

हे देखील वाचा