Monday, July 1, 2024

Photo: गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत अरबाज झाला रोमँटिक; कपलच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

अभिनेता अरबाज खान आता चित्रपटांमध्ये क्वचितच पाहायला मिळतो. मात्र, असे असले, तरीही तो सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. मलायका अरोरापासून विभक्त झाल्यानंतर तो अनेकदा आपली गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या जोडीला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. अभिनेत्याने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तो जॉर्जियासोबत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.

गर्लफ्रेंडसोबत सुट्टीचा घेतला आनंद
मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीने अभिनेता अरबाज खानच्या आयुष्यात प्रवेश केला. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. अलीकडेच दोघेही मालदीवमध्ये क्वालिटी टाईम घालवताना दिसले. यावेळी अरबाजने त्याचे काही फोटो अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. अरबाज आणि जॉर्जिया मालदीवमध्ये एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत. त्यांच्या या रोमँटिक फोटोंवर त्याचे चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (Actor Arbaaz Khan Shared Romantic Vacation Photos With Girlfriend Giorgia Andriani)

अरबाजने शेअर केले फोटो
अरबाजने इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर करत खास कॅप्शनही दिले आहे. त्याने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “अमाया कुडा राह येथे आमच्या मुक्कामाचा आनंद घेतला… अद्भूत आदरातिथ्याबद्दल धन्यवाद.”

अरबाजच्या या फोटोला आतापर्यंत ४२ हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो कमेंट्सचाही वर्षाव झाला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे की, “व्वा, सुंदर जोडपे.” तसेच दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे की, “तुम्ही दोघेही खूप सुंदर दिसताय.”

अरबाजने लॉकडाऊनदरम्यानही जॉर्जियासोबतचे फोटो शेअर केले होते. जिथे संपूर्ण कुटुंब एकत्र आपल्या फार्म हाऊसमध्ये वेळ घालवताना दिसले होते.

चित्रपटातही झळकणार जॉर्जिया
जॉर्जिया लवकरच ‘वेलकम टू बजरंगपूर’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. यापूर्वी तिने वेबसीरिज ‘कॅरोलिन एँड कामाक्षी’मध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. दुसरीकडे अरबाज ‘गर्व: प्राईड एँड ऑनर’, ‘दबंग’, ‘दबंग २’, ‘हलचल’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘हॅलो ब्रदर’ यांसारख्या चित्रपटात झळकला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-क्या बात है! अभिनेत्री प्रियांका चोप्राने शेअर केला नवीन फोटो, पाहायला मिळाली तिच्या जाऊबाईंची झलक

-चाहत्यांसाठी खुशखबर! रजनीकांत यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, फोटो केले शेअर

-जान कुमार सानू सिद्धार्थ शुक्लाला देणार ट्रिब्यूट? नवीन गाण्याची घोषणा करताच ट्रोलर्सने साधला निशाणा

हे देखील वाचा