Wednesday, December 6, 2023

अर्जुन अन् तब्बूच्या ‘कुत्ते’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज, राधिका मदानच्या हॉटनेसने वेधले लक्ष; पाहा व्हिडिओ

‘रंगून’, ‘ओंकारा’ आणि ‘मकबूल’ यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शन करणाऱ्या विशाल भारद्वाज यांचा मुलगा आसमान भारद्वाज हादेखील वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत आहे. आसमान ‘कुत्ते’ या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. अर्जुन कपूर आणि तब्बू अभिनित हा सिनेमा नावावरूनच चर्चेचा विषय ठरत आहे. अशात या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे, या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना भलताच आवडत आहे.

‘कुत्ते’ (Kuttey) या सिनेमाचा ट्रेलर एकूण 2.42 मिनिटांचा आहे. या ट्रेलरमध्ये सिनेमाची जी झलक पाहायला मिळत आहे, त्यावरून हा सिनेमा एकदम दमदार असल्याचे दिसते. हा सिनेमा डार्क थ्रिलर असल्याचे दिसत आहे. यामध्ये काळजाचा ठोका चुकवणारे डायलॉग्ज आणि भन्नाट कॉमेडीचे मिश्रण आहे.

काय आहे ‘कुत्ते’ची कहाणी?
‘एक हड्डी और पीछे पड़े हैं सात कुत्ते’ अशी ‘कुत्ते’ सिनेमाची टॅगलाईन आहे. या सिनेमाची कहाणी पोलीस आणि राजकारण्यांच्या भ्रष्टाचारासारखी वाटत आहे. यामध्ये कोंकणा सेन शर्मा ही नक्षलवाद्यांचे नेतृत्व करणारी दिसत आहे. सिनेमात अनुराग कश्यपही दिसत आहे, ज्याची भूमिका एका नेत्यासारखी दिसत आहे. नसीरुद्दीन शाह हेदेखील या सिनेमात असून ते यामध्ये एका गँगस्टरची भूमिका निभावत असल्याचे वाटत आहे, जो या सर्व खेळात आपला कसा फायदा होईल, यावर लक्ष ठेवून बसला आहे.

या सिनेमात तब्बू (Tabu), अर्जुन कपूर (Arjun Kapoor), आणि कुमुद मिश्रा (Kumud Mishra) हे पोलिसांच्या भूमिकेत आहेत. ट्रेलरवरून दिसते की, हे सर्वजण नंतर भ्रष्ट बनतात. या सर्वांमध्ये राधिका मदान (Radhika Madan) आणि शार्दुल भारद्वाज एक जोडपे बनले आहेत, ज्यांना एका प्लॅनची माहिती मिळते. हा सर्व खेळ नसीरुद्दीन यांच्या पात्राने रचल्याचे दिसत आहे. तसेच, ट्रेलर पाहून असेही वाटते की, कदाचित प्लॅनची माहिती मिळाल्यानंतर राधिका आणि शार्दुल हा खेळ बिघडवणार असल्याचेही वाटते. या ट्रेलरला 7 तासांच्या आत युट्यूबवर 11 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

कधी होणार रिलीज?
‘कुत्ते’ सिनेमात अर्जुन कपूर, तब्बू, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदान, नसीरुद्दीन शाह यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘कुत्ते’ हा सिनेमा 13 जानेवारी, 2023 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. अशात या सिनेमाची टक्कर 25 जानेवारी रोजी रिलीज होत असलेल्या ‘पठाण’ या सिनेमाशी आहे. अशात कोण कोणावर भारी पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (actor arjun kapoor and tabu film kuttey trailer release see here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘संत तुकाराम महाराज माझ्याकडे 22 वेळा आले’, भलताच चर्चेत असलेल्या सुबोध भावेचं वक्तव्य
आतल्या गोटातील खबर! सलमानमुळे ‘हा’ दिग्दर्शक पडणार कठीण काळातून बाहेर, केलीय हातमिळवणी?

हे देखील वाचा