Saturday, April 20, 2024

प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांना आवडत नाहीत रिमिक्स गाणी; तर गुलजार यांचा गायकांना मोलाचा सल्ला

बदलत्या काळानुसार चित्रपट देखील बदलत आहेत अशात चित्रपटांमधील गाणी देखील वेगळ्या अंदाजामध्ये पाहायला मिळत आहेत. एकेकाळी आरडी बर्मन, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्यासारख्या संगीतकारांची गाणी मनाला शांत करायची. त्यांचे संगीत ऐकून मनातली धाकधूक, घालमेल आणि नैराश्य दूर होऊन जायचे. अशात सर्व बदलत चालले असल्याने अनेक जुनी गाणी नवीन स्वरूपात रिमिक्समध्ये ऐकायला मिळतात. यातील काही गाणी खूप चांगली चालतात, तर काही गाण्यांचा काहीच थांगपत्ता आणि अर्थ नसतो. स्वतः गायकाला देखील ही गाणी समजत असतील का? असा प्रश्न पडतो. पूर्वीचे गायक एखाद्या गोष्टीला प्रभावित होऊन गाणे लिहायचे. आता तसं काहीच होत नाही. अनेक गायकांवर ती गाणी चोरल्याचा आरोप देखील होतो.

लता दीदींचे २२ वर्षां आधीचे गाणे केले प्रदर्शित
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांना त्यांच्या चित्रपटांसह उत्तम संगीतासाठी ओळखले जाते. मंगळवारी लता दीदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी लता दीदींनी गायलेले एक गाणे प्रदर्शित केले आहे. हे गाणे विशाल भारद्वाज यांनी त्यांच्या एका चित्रपटासाठी लता दीदींकडून गाऊन घेतले होते. मंगळवारी २२ वर्षांनी त्यांनी हे गाणे प्रदर्शित केले. (Dislikes: Vishal Bhardwaj said – remix spoils creativity, Gulzar gave this advice to singers)

रिमिक्स गाणी आवडत नाहीत
विशाल भारद्वाज यांना रिमिक्स गाणी अजिबात आवडत नाहीत. त्यांचे असे म्हणणे आहे की, “रिमिक्स गाणी फार खास नसतात. दुसऱ्या कुणाच्या गाण्यांमध्ये अशा पद्धतीने फेरबदल करणे चुकीचे आहे. असे केल्याने त्यावेळी लिहिलेल्या त्या गण्यामागचे गांभीर्य नष्ट होते. नुकतच ‘लैला ओ लैला’ हे गाणं आलं होतं. माझा मुलगा म्हणाला छान गाणं आहे, पण त्याला हे माहिती नव्हतं की, हे एका जुन्या चित्रपटाचं गाणं आहे. जर लोकांना एखाद्या गण्या मागची पार्श्वभूमीच माहिती नसेल आणि असे गाणे बनवले, तर ते गाण्याचा दर्जा कमी करतात.”

पुढे त्यांनी त्यांना कोणते संगीत आवडते हे सांगितले, “ते म्हणाले की मला ६० ते ७०च्या दशकातील संगीत आवडते. खरं तर, प्रत्येकच संगीत आपल्या आपल्या काळातील वातावरण दाखवत असते. आमच्या ६० ते ७० च्या दशकातील संगीत फार छान होते. त्यावेळी एकापेक्षा एक सुमधुर गायक होते.”

लोकांना गुलजार यांनी दिला आहे सल्ला
गुलजार म्हणाले की, “मी हाच प्रयत्न करतो की, माझी सर्व गाणी जे साकारणार आहेत त्यांना सोईस्कर पडावी. जो कलाकार अभिनय करताना हे गाणे साकारणार आहे त्याला याचे शब्द नीट समजावे. तसेच मी माझी गाणी समोरच्या व्यक्तीकडे पाहूनच लिहिली आहेत. मी नेहमी संगीताच्या धूनवर लक्ष ठेवले आणि ही धून येते संगीत दिग्दर्शकांकडून. मी २० ते २५ वर्षांपासून सांगत आहे की, आधी गाण्याचे संगीत बनते, मग त्याचे शब्द लिहिले जातात. आज काल असे दिसत नाही. सध्या जीभ इंग्रजी आहे आणि गाणे हिंदी हवे आहे.”

नवीन गाणी बनवणार आहेत विशाल भारद्वाज
विशाल भारद्वाज यांनी सांगितले की ते या गण्यासह आणखीन नवीन गाणी बनवणार आहेत. ते म्हणाले की, “आमचा एक चित्रपट होता ‘लंडन’ त्यामध्ये ‘तनहाई’ हे गाणं होतं ते देखील लता दीदींनी गायल होतं. त्या गाण्याची कॅसेट मी सनी देओलकडून घेणार आहे.”

सिनेसृष्टीमध्ये सध्या मनाला शांत करणारी नाही, तर डोक्याला झिणझिण्या आणणारी डीजे आणि रॅपसारखी गाणी अनेक चित्रपटांमध्ये दिसत असतात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-धक्कादायक! ‘बिग बॉस १५’मध्ये सामील होण्यापूर्वीच ‘या’ स्पर्धकाला पॅनिक अटॅक; सुरू होण्यापूर्वीच सोडला शो

-तरुणांना मागे टाकत ‘बिग बॉस’ जिंकली होती ‘ही’ मिश्यांमधील वृद्ध महिला, पाहून तुम्हीही व्हाल अचंबित

-बोल्ड फोटोंमुळे राधिका आली होती ट्रोलर्सच्या निशाण्यावर; ‘माझं शरीर…’, म्हणत सुनावले त्यांना खडेबोल

हे देखील वाचा