Friday, March 6, 2026
Home बॉलीवूड मालदिवमध्ये एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेतायत मलायका आणि अर्जुन, इंस्टा स्टोरीवरील फोटो व्हायरल

मालदिवमध्ये एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेतायत मलायका आणि अर्जुन, इंस्टा स्टोरीवरील फोटो व्हायरल

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे नाते आता काही कोणासाठी नवीन नाही. सुरूवातीला सर्वांपासून त्यांनी त्यांचे नाते लपवण्याचा प्रयत्न केला मात्र तो काही यशस्वी झाला नाही. मग त्यांनी त्यांचं नाते जगासमोर स्वीकारले. नाते स्वीकारल्यानंतर त्यांनी खुल्लम खुल्ला एकमेकांसोबत फोटो टाकायला सुरुवात केली. इतकेच नाहीतर त्यांना एकत्र देखील स्पॉट केले जाते. अनेकदा सुट्ट्यांसाठी दोघे सोबत देखील जातात. सध्या अर्जुन आणि मलायका मालदीवमध्ये त्यांच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मलायका आणि अर्जुन दोघांनीही त्यांच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून या सुट्ट्यांचे फोटो शेअर केले आहेत.

Photo Courtesy: Instagram/malaikaaroraofficial

मलायका आणि अर्जुन मालदीव येथील पटीना बेटावर त्यांच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या या दोघांनी त्यांच्या इंस्टास्टोरीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी त्यांचे सोलो फोटो शेअर केले असून, एकही दोघांचं एकत्र फोटो यात दिसला नाही. काही फोटोंमध्ये मलायका बिकिनीमध्ये तिचे सेल्फी घेताना दिसली तर अर्जुन रिलॅक्स करताना दिसला.

Photo Courtesy: Instagram/malaikaaroraofficial

काही दिवसांपूर्वीच या दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्यांनी खूपच जोर पकडला होता. सगळीकडे अर्जुन मलायकाचे ब्रेकअप झाल्याच्या अनेक बातम्या येत होत्या आणि हे दोघे एकमेकांशी बोलत नाही असे देखील सांगितले गेले. कदाचित बराच काळ त्यांना सोबत पाहिले गेले नव्हते, म्हणूनच अशा वावड्या उठल्या होत्या. मात्र आता या फोटोंनी सर्वांच्या प्रश्नांवर आणि अफवांवर पूर्णविराम लावला आहे. अर्जुनने त्याच्या इंस्टास्टोरीमध्ये त्याचा रिलॅक्स मोडमधला फोटो शेअर करत लिहिले, “जेव्हा ती तुम्हाला सुट्ट्यांमध्ये इंस्टाग्राम चेक करताना बघते.” यासोबतच मलायकाचे काही हॉट फोटो देखील व्हायरल होत असून, त्या फोटोंमध्ये तिची आकर्षक फिगर दिसत आहे.

Photo Courtesy: Instagram/ arjunkapoor

मलायका आणि अर्जुन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास सध्या मलायका ‘इंडिया बेस्ट डान्सर २’मध्ये परीक्षकांची भूमिका साकारताना दिसत आहे. तर अर्जुनाचा काही दिवसांपूर्वीच ‘भूत पोलीस’मध्ये दिसला होता. लवकरच तो ‘एक व्हिलन २’ मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुणाल गांजावाला रसिकांसाठी घेऊन आला ‘भन्नाट पोरगी’, पाहायला मिळाली निक अन् सानिकाची रोमँटिक केमिस्ट्री

-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

-पती राजकुमार रावला निरोप देताना विमानतळावरच भावुक झाली पत्रलेखा, अभिनेत्यानेही दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

हे देखील वाचा