राडाच ना! अर्जुन कपूरने खरेदी केली कोट्यवधी रुपयांची आलिशान कार; ‘फरार’ होण्यासाठी झालाय सज्ज


बॉलिवूड कलाकार नेहमीच आपल्या महागड्या वस्तूंसाठी ओळखले जातात. त्यात आलिशान गाड्या, महागडे बंगले, कपडे आणि बरंच काही. त्यांनी नवीन खरेदी केलेल्या वस्तूंबाबत ते नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात. असेच काहीसे अभिनेता अर्जुन कपूरबाबतही आहे. त्याने नुकतीच आलिशान गाडी खरेदी केली आहे. याची पहिली झलक त्याने आपल्या चाहत्यांना दाखवली आहे. (Actor Arjun Kapoor Ready To Abscound With His New Luxury Car)

अर्जुनने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लँड रोव्हर डिफेंडर या गाडीचा पहिला फोटो शेअर केला आहे. त्याने शेअर केलेला हा फोटो सध्या चाहत्यांमध्ये आता चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. खरं तर या गाडीची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. जी खरेदी करणे कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी कदाचित अशक्य गोष्ट आहे. अभिनेत्याच्या चाहत्यासोबतच सेलिब्रिटीही त्याला या गाडीसाठी शुभेच्छा देत आहेत.

अर्जुनने आपल्या गाडीसोबतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “या शानदार अनुभवासाठी मोदी मोटर्स जग्वार लँड रोव्हर वरळीचे आभार! आपली नवीन कार लँड रोव्हर डिफेंडरसोबत फरार होण्याचे नवीन निमित्त.”

दोन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या अभिनेताच्या या पोस्टला आतापर्यंत ३ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. फोटोत अर्जुन आपल्या गाडीसोबत कूल पोझ देऊन उभा आहे. त्याच्या या मेटेलिक गोल्ड रंगाच्या गाडीवर चाहते फिदा झाले आहेत.

माध्यमांतील वृत्तानुसार, अभिनेत्याच्या या गाडीची किंमत एक कोटी रुपयांच्या आसपास असू शकते. अर्जुनने मागील महिन्यातच एक लग्झरी स्कायव्हिला खरेदी केला होता. त्याची किंमत २० कोटी रुपये होती.

अर्जुनच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो नुकताच ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत परिणीती चोप्राही दिसली होती. त्यांचा हा चित्रपट ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद

-‘ही’ गोष्ट अधिक प्रिय असल्यामुळे, बॉलिवुड पार्ट्यांमध्ये जाणे टाळतो अक्षय कुमार; अभिनेत्याने स्वत: केला होता खुलासा

-मीडियम शॉर्ट हेअरमध्ये बरीच सुंदर दिसतेय ऋता; नवीन हेअरकट फ्लाँट करताना दिसली अभिनेत्री


Leave A Reply

Your email address will not be published.